शेतकऱ्याच्या गाईला विष घालून केले ठार

शिक्रापूर- शिक्रापूर (ता. शिरूर) येथील राऊतवाडी येथे अज्ञात व्यक्तीने शेतकऱ्याच्या गाईला मारण्यासाठी विषारी औषधाचा वापर केल्या असल्याचा प्रकार समोर आला असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील राऊतवाडी येथे कृष्णा भूमकर या शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये दोन गाई असून, शनिवारी (दि. 28) कृष्णा हे सायंकाळच्या सुमारास गाईला चार घालण्यासाठी गोठ्यात गेले असता त्यांना गोठ्यामध्ये उग्र वास येत असल्याचे आणि गाईला त्रास होत असल्याचे जाणवले, त्यामुळे त्यांनी तेथे पाहणी केली असता त्यांना गोठ्यामध्ये पांगलेले आणि विषारी असलेल्या थायमिटचा पुडा आढळून आला, त्यांनतर त्यांनी येथील खासगी जनावरांच्या डॉक्‍टरांना बोलाविले आणि गाईवर उपचार सुरू केले; परंतु त्यांनतर देखील गाईला त्रास होत राहिल्याने त्यांनी जनावरांच्या शासकीय डॉक्‍टरांना बोलाविले, त्यांनी देखील उपचार सुरू केले; परंतु गाईला विषबाधा झाल्याने कृष्णा भूमकर या शेतकऱ्यांची गाय दगावली, त्यामुळे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने शेतकऱ्याच्या गाईला विष देऊन मारले असल्याबाबत शेतकरी कृष्णा महादेव भूमकर (रा. राऊतवाडी, शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कृष्णा कानगुडे करीत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)