शेतकऱ्यांनी नैसर्गिक खतांचा वापर करावा

संग्रहित छायाचित्र...

डॉ. अरुण दीक्षित; एमकेसीएल, मराठी विज्ञान परिषदेतर्फे वैज्ञानिक कट्टा
पुणे – “नैसर्गिक खते शेतीसाठी अधिक उपयुक्त असतात. त्यातून उत्तम दर्जाचे उत्पन्न निघू शकते. शिवाय, विषमुक्त शेती करणे शक्‍य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रसायनाचा अधिक वापर करण्यापेक्षा उपलब्ध नैसर्गिक आणि पोषक खतांचा वापर करावा. यासाठी अझोलासारख्या पाणवनस्पतीचे संवर्धन करून आपण कसा वापर करू शकतो यावर काम सुरु आहे,” असे मत पाबळ येथील विज्ञान आश्रमातील संशोधक डॉ. अरुण दीक्षित व्यक्त केले.
मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग (मविप), मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्र व महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वैज्ञानिक कट्ट्यावर डॉ. दीक्षित बोलत होते. नत्रचक्र (नायट्रोजन सायकल) कसे व कोण चालवते? हा त्यांच्या गप्पांचा विषय होता. यावेळी परिषदेचे अध्यक्ष विनय र. र., डॉ.विद्याधर बोरकर उपस्थित होते.
डॉ. दीक्षित म्हणाले, “कर्ब, प्राणवायू, हायड्रोजन, नत्रवायू, स्फुरद व पालाश यांची प्रामुख्याने वनस्पतीना आवश्‍यकता असते. शेतकऱ्यांनी एकच पीक घेण्यापेक्षा आलटून-पालटून पिके घ्यावीत. कडधान्य, ताग अशी पिके घेतल्यास जमीन पोषक बनते व जमिनीमध्ये नत्राचे स्थिरीकरण होते. यातून शेतकऱ्याला चांगले उत्पन्न मिळण्यास मदत होते. तसेच अझोलासारखी पाणवनस्पती नत्राचे उत्तमरीत्या स्थिरीकरण करते. ज्या वनस्पतींना जास्त प्रमाणात पाण्याची आवश्‍यकता असते. त्याठिकाणी अझोला लावल्यास त्या पिकाला उत्तम खत मिळू शकते. या पाणवनस्पतीपासून जैव खत करणे सोपे, स्वस्त आणि पिकांच्या दृष्टीने उपयोगी असल्याचे सिद्ध झाले आहे. व्यापारी तत्वावर ते पिकांसाठी कसे उपलब्ध होईल याचे संशोधन पाबळ येथे सुरु आहे. अडसळी, कडधान्यांची लागवड केल्यास त्यांच्या मुळाशी असणारे सूक्ष्मजीव जमिनीतल नत्राचे प्रमाण वाढवतात. परंतु या पद्धतीला शेतकऱ्याकडून जास्त पसंती मिळत नसल्याचेही डॉ. दीक्षित म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)