शेतकरी मेळाव्याचे 10 हजार विद्यार्थी नियोजन करणार

  • डॉ. शशिकांत तरंगे : अंथुर्णेत आढावा बैठक

रेडा – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. 30) अंथुर्णे (ता. इंदापूर) येथे पार पडणाऱ्या शेतकरी मेळाव्यांसाठी तब्बल 10 हजार विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित राहून नियोजन करतील, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवकचे प्रदेश सरचिटणीस डॉ. शशिकांत तरंगे यांनी दिली.
अंथुर्णे येथील सभागृहात आमदार दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत व विद्यार्थी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शुभम निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी मेळाव्यात विद्यार्थी सहभाग आढावा बैठक पार पडली त्यावेळी तरंगे बोलत होते. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख सागर मिसाळ, इंदापूर तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष अशोक चोरमले, तालुका युवक अध्यक्ष सचिन सपकळ, युवा नेते विष्णू पाटील, विंरसिंह रणसिंग, तेजस देवकाते, आण्णासाहेब साळुंके, अमरजित खारतोडे, योगेश पाटील, अमर मारकड, अनिल काळे, योगेश डोंबाळे, आकाश कांबळे आदिंसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. शशिकांत तरंगे म्हणाले की, राज्यात व केंद्रात चुकीच्या पद्धतीने निर्णय प्रक्रिया होत असल्याने शेतकरी दोशोधडीला लागला असून अनेक प्रश्‍न व समस्या वाढत चालल्या आहेत. या उपेक्षित शेतकरी वर्गाला न्याय मिळावा यासाठी हा शेतकरी मेळवा आयोजित केला आहे. याप्रसंगी तालुक्‍यातील सर्व तळागाळातील नागरिक व शेतकरी सहभागी होणार आहे. तसेच 10 हजार विद्यार्थी या मेळाव्यात हजेरी लावतील असे नियोजन विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी केले आहे. तसेच युवक राष्ट्रवादीच्या माध्यमातून किमान 20 हजार युवा वर्ग मेळावा यशस्वी करण्यासाठी काम करीत असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रस्ताविक तालुका अध्यक्ष शुभम निंबाळकर यांनी केले तर आभार सागर मिसाळ यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)