शेकडो “आधार’ रस्त्याकडेला “निराधार’

– सोसायटीच्या पार्किंमध्ये फेकला गठ्ठा
– हडपसर टपाल विभागाचा अजब कारभार
– शिक्षकाने पुढाकार घेत पाठविले आधार कार्ड

हडपसर – आधार कार्ड एका सोसायटीच्या पार्किंमध्ये फेकून दिल्याने हडपसर पोस्ट कार्यालयाच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. एका शिक्षकाने या आधार कार्डचा गठ्ठा उचलत त्यावरील क्रमांकाद्वारे काही नागरिकांशी संपर्क करत त्यांच्यापर्यंत आधार कार्ड पोहचवण्याची जबाबदारी पार पाडली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हडपसर पोस्ट कार्यालयातून काही नागरिकांचे आधार कार्ड येणे अपेक्षित होते. मात्र, वर्षभरापूर्वी काढलेले तब्बल 55 आधार कार्ड नुकतेच हडपसर आकाशवाणी समोरील चिंतामणी प्लाझा हाउसिंग सोसायटीच्या दुचाकी पार्किंमध्ये बेवारस अवस्थेत आढळून आले. याच परिसरात राहणारे शिक्षक तुकाराम डोंगरे यांनी ही आधार कार्ड ताब्यात घेतली. यानंतर त्यावरील मोबाइल क्रमांकावरून काही नागरिकांशी संपर्क करत आधार कार्ड त्यांच्या स्वाधीन केले.

टपाल विभागाचा अजब कारभार
आधार कार्ड मिळविण्यासाठी नागरिक धडपड करताना शहरात दिसून येते. तर, दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने आधार कार्ड फेकले जात आहेत. त्यामुळे हा प्रकार कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)