बॅंका, भांडवली वस्तू, आरोग्य, धातू, रिऍल्टी, वाहन क्षेत्र तेजीत
मुंबई – जागतीक बाजारातून आज सकारात्मक संदेश आले. त्याचबरोबर पिट्च या पतमानांकन संस्थेने मध्यम पल्ल्यात भारताचा विकास दर वाढण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजारात खरेदीचे वातावरण होते. त्यामुळे निर्देशांक वाढून आता ते तीन महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर गेले आहेत.
शुक्रवारी बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 256 अंकांनी वाढून 34969 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 74 अंकांनी वाढून 10692 अंकांवर बंद झाला. सकाळी सेन्सेक्स 35 हजारावर गेला होता मात्र नंतर काही क्षेत्रात नफेखोरी झाल्यामुळे निर्देशांकाना ती पातळी राखता आली नाही. काल सेन्सेक्स 212 अंकानी वाढला होता.
सरलेल्या आठवड्यात सेन्सेक्स 554 अंकानी तर निफ्टी 128 अंकानी वाढला आहे. गेल्या पाच आठवड्यापासून निर्देशांक वाढत आहेत. आज बॅंका आणि वित्तीय कंपन्या आणि बॅंकाच्या शेअरकडे गुंतवणूकदारांचा ओढा होता.त्यामुळे या क्षेत्रातील कंपन्याचे शेअर 9 टक्क्यांपर्यंत वाढल्याचे दिसून आले.
देशातील संस्थागत गुतवणूकदारांनी काल 684 कोटी रुपयांच्या शेअरी खरेदी केली तर परदेशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 1056 कोटी रुपयांच्या शेअरी विक्री केली. ऍक्सिस बॅंकेने बराच तोटा झाला असल्याचा ताळेबंद जाहीर केला. तरीही या बॅंकेच्या शेअरच्या भावात वाढ झाली. कारण बॅंकेने अनुत्पादक मालमत्तेसाठी पुरेशी तरतूद केली आहे. त्यामुळे बॅंक आगामी काळात चांगला ताळेबंद जाहीर करण्याची शक्यता गुंतवणूकदारांना वाटते.
आज छोटया कंपन्यावर अधारीत मिडकॅप 0.79 टक्क्यानी तर स्मॉल कॅप 0.42 टक्क्यानी वाढला. भांडवली वस्तू, तेल आणि नैसर्गिक वायू, आरोग्य, धातू, रिऍल्टी, पायाभूत सुविधा, वाहन आणि ग्राहक वस्तू क्षेत्राचे निर्देशांक 1.40 टक्क्यापर्यंत वाढले. मात्र नफेखारीमुळे माहीती तंत्रज्ञान क्षेत्राचा निर्देशांक कमी झाला. गेल्या काही दिवसापासून या क्षेत्राचा निर्देशांक वाढत होता.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा