शी जिनपिंग यांच्या बरोबरची चर्चा फलद्रुप – मोदी

जोहान्सबर्ग – सध्या दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी आपसातील सहकार्याबाबत चर्चा केली. दोन्ही नेत्यांच्या अलिकडच्या काळात सातत्याने झालेल्या भेटींमुळे दोन्ही देशांमधील मैत्री संबंधांना जी चालना मिळाली आहे ती कायम ठेवण्याचा व त्याअनुषंगाने सीमेवर शांतता कायम ठेवण्याचा निर्णय या बैठकीत झाला आहे. तशी सूचना दोन्ही देशांच्या नेतृत्वाने आपापल्या लष्करालाही देण्याचे ठरले आहे अशी माहिती भारतीय सूत्रांनी दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर आमच्यातील चर्चा अतिशय फलद्रुप झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

मोदी आणि जिनपिंग यांच्यात एप्रिल आणि जून महिन्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. या भेटींचा उल्लेख करून मोदींनी म्हटले आहे की त्यातून भारत-चीन संबंधांना नवीन बळकटी मिळाली आहे. आणि त्यातून नवीन संधीही उपलब्ध झाली आहे. या मैत्री संबंधांतून होणाऱ्या प्रगतीचा नियमीत आढावा घेण्याची आणि त्याअनुषंगाने योग्य त्या सूचना आपसातील सरकारी यंत्रणांना देण्याची गरजहीं मोदींनी व्यक्त केली आहे. डोकलाम सारखी स्थिती पुन्हा होऊ नये म्हणून दोन्ही देशांनी आपापल्या लष्कराला योग्य त्या सूचना देण्याचेही ठरले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लष्कराने आपसातील संपर्क वाढवून परस्परांमध्ये विश्‍वासाचे वातावरण कायम ठेवावे अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली आहे. विदेश सचिव विजय गोखले यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशांतील सीमा प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लगार अजित डोवाल यांना लवकरच चीनला पाठवण्याची तयारी दर्शवली आहे. भारत आणि चीन यांनी आपसातील संबंध अधिक दृढ करण्याचा मनोदय व्यक्त केल्याने दोन्ही देशांतील अधिकारी त्यानुसार प्रयत्न करीत आहेत असेही गोखले यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)