शिवेंद्रसिंहराजे थापाडे तर नरेंद्र पाटील अतिशहाणे

सातारा प्रतिनिधी

सातारा जिल्हयातील टंचाईग्रस्त गावांसाठी भाजपचे पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी पाठपुरावा करून केंद्राकडून 367 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला . यामध्ये सातारा तालुक्‍यातील सात व जावली तालुक्‍यातील 26 गावे आहेत . मात्र साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले मात्र या कामाचे खोटे श्रेय घेउन जनतेची दिशाभूल करत आहेत . गेल्या पंधरा वर्षात आमदारांनी सातारा जावली विधानसभा मतदारसंघात किती निधी आणला ? याचा हिशोब थापाड्या आमदारांनी द्यावा अशी घणाघाती टीका भाजपचे जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनी पत्रकार परिषदेत केली

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पवार पुढे म्हणाले , सातारा तालुक्‍यातील सात गावांना राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेत सव्वादोन कोटी रुपये मिळाले तर 26 गावांना 7 कोटी77 लाख रुपये मंजूर झाले . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केल्याने सातारा जावली विधानसभा मतदारसंघातील 7 पैकी 3 रस्त्याची कामे मंजूर झाली . वेण्णा ते वेळकामथी व खर्शी ते सोनगाव या रस्त्यांना प्रत्येकी चार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत .बबनराव लोणीकर यांनी सातारा जिल्ह्यासाठी केंद्राकडून 367 कोटी रूपये मंजूर करून आणले.

पवार पुढे म्हणाले मी मागील विधानसभा निवडणूकीमध्ये 54 हजार मते घेतली . त्यामुळे सातारा विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री माझी शिफारस मान्य करतात . मात्र साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले थापाडे आमदार असून ते जनतेची दिशाभूल करत आहेत . ते कामच न करणारे खोटारडे आमदार असून त्यांनी काहीच काम केलेली नाही . जर त्यांनी पंधरा वर्षात कामे केली तर त्यांनी हिशोब द्यावा, प्रत्येक कामाचा लेखाजोखा मांडावा . स्वतःला ते राजघराण्यातील समजतात यांच्याकडे पन्नास वर्ष सत्ता होती मात्र महू हातगेघर धरणासाठी एक रुपया त्यांनी आणला नाही . मात्र आम्ही या मातीच्या धरणासाठी चाळीस कोटी रुपये गिरीश महाजन यांच्याकडून आणले . त्यामुळे आमदारांनी थापेबाजी बंद करावी . जे श्रेय भाजपच आहे त्यावर राष्ट्रवादीने डल्ला मारू नये अशी टीका पवार यांनी केली .आमदारांच्या या खोटारडेपणाची पत्रके सर्व मतदारसंघात जनतेला वाटणार असल्याचे पवार यांनी सांगितले .

नरेंद्र पाटील अतिशहाणे
महेश शिंदे व दीपक पवार यांची थापेबाजी सुरू असून त्यांना केरळा पार्टी अशी टीका शिवसेनेचे नरेंद्र पाटील यांनी केली होती . त्यावर पवार म्हणाले केरळा पार्टी म्हणजे काय ? हे तुम्हीच त्यांना विचारा कारण ते अतिविद्वान आहेत . आमच्या बरोबरच ते सत्तेत भागीदार आहेत याची जाणीव त्यांनी ठेवावी . साताऱ्यात जी विकासकामे केली त्याचे श्रेय भाजपचे आहे . शहरातील ग्रेड सेपरेटरला नितीन गडकरी यांनी सत्तर कोटी रुपये दिली पण भाजप ने कधी श्रेयवादाचा भपका केला नाही असा टोला त्यांनी लगावला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)