शिवाजी महाराज ऐकाला सोपे मात्र… – डॉ. काळे

चिंबळी- आपल्या जिवनातील प्रत्येक नितीमूल्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अखंडपणे जोपासली. जात-पात, भेदभाव न करता स्वराज्यासाठी स्वत:सोबत प्रत्येक मावळा घडवला. परस्त्री मातेसमान हा मूलमंत्र जपत त्यांनी सदैव स्त्रियांचा आदर सन्मान केला. गनिमीकाव्यातून पुढच्या अनेक पिढ्यांसाठी अजरामर असलेले स्वराज्य उभे केले. छत्रपती शिवाजी महाराज हे जितके ऐकायला सोपे आहेत तितकेच ते आचरणात आणणे कठीण आहेत, असे मत कुरुळी येथील आनंद इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अनिल काळे यांनी व्यक्‍त केले. कुरुळी (ता. खेड) येथील आनंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. काळे बोलत होते. यावेळी विद्यार्थ्यांनी साकारलेले शिवाजी महाराज, मावळे, जिजाबाई या वेशभूषा सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. दरम्यान, यानिमित्ताने बालसभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी स्कूलच्या सचिव अनघा काळे यांच्यासह शाळेतील शिक्षक, कर्मचारी, पालक विद्यार्थी उपस्थित होते. दरम्यान, विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांवर आधारित गीते पोवाडे, नृत्य व भाषणांमधून महाराजांचे जीवनपट उभा केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)