शिवसेनेला खिंडार; विजय बोरुडे भाजपमध्ये

नगर – शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांचे खंदे समर्थक विजय बोरुडे यांनी आज मुंबईत मंत्रालयात तीन मंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष खा.दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश झाला. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील व पालकमंत्री प्रा. राम शिंदे उपस्थित होते.
यावेळी भाजप गटनेते सुवेंद्र गांधी, संघटन सरचिटणीस किशोर बोरा, नगरसेवक महेश तवले, प्रशांत मुथा, मनेश साठे, राजेंद्र अन्माल आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी खा. गांधी यांनी ना. महाजन यांना नगरमध्ये महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून, भाजप सर्व ताकदीने निवडणूक स्वबळावर लढणार असल्याने जळगाव प्रमाणेच नगरमध्येही एक हाती सत्ता आणायची आहे. त्यासाठी सहकार्य व मार्गदर्शन करावे अशी विनंती केली. यावेळी बोरुडे म्हणाले, खा. गांधी यांच्या नेतृत्वाखाली भाजपत यापुढे काम करणार असून शहरासह उपनगरात भाजपचे काम वाढण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)