शिवसेनेची चाणक्य नीती ; प्रचाराची जबाबदारी प्रशांत किशोर उचलणार ?

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने टर्म कार्ड खेळले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत महत्वपूर्ण कामगिरी बजावणारे जेडीयूचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी’मातोश्री’वर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबत महत्त्वाची चर्चा केली.

दरम्यान, 2019 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या प्रचाराची जबाबदारी प्रशांत किशोर उचलणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

या बैठकीत हेमंत गोडसे, गजानन कीर्तिकर, शिवाजी आढळराव पाटील, चंद्रकांत खैरै, राहुल शेवाळे, अरविंद सावंत, अनंत गीते, संजय राऊत, श्रीकांत शिंदे यांच्यासोबत रामदास कदम, संजय राठोड, निलम गोऱ्हेही उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)