शिवसेना युवासेना उपतालुका अधिकारीपदी वलटे

लोणी काळभोर- येथील युवा कार्यकर्ता श्रेयस कैलास वलटे यांची शिवसेना युवासेना उपतालुका अधिकारीपदी नियुक्‍ती करण्यात आली आहे. त्यांना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते नियुक्‍तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी शिवसेना महिला आघाडी जिल्हाध्यक्ष श्रद्धा कदम, उपतालुका प्रमुख रमेश भोसले, युवासेना विभागप्रमुख अजय माने, शिवसैनिक व युवासेना कार्यकर्ते उपस्थित होते. आपण या पदाच्या माध्यमातून युवासेनेचा प्रचार व प्रसार करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण हे कार्य युुुवासेनेच्या माध्यमातून पुुुढे नेणार असल्याची माहिती श्रेयस वलटे यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.