शिवसेना-भाजपातील भांडणे ही लुटुपूटूची – विनायक मेटे 

कोल्हापूर  – शिवसेना-भाजपमध्ये युती होणारच आहे. सध्या सुरु असलेली भांडणे ही लुटुपूटूची असून फारसे गांभिर्याने घेण्यासारखे नाही, अशी टिप्पणी शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी केली. शिवसंग्राम भाजपसोबतच निवडणूक लढवणार आहे. जागा वाटपाची अनौपचारीक चर्चा झाली असून 9 फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत औरंगाबादला होणाऱ्या निर्धार मेळाव्यात चित्र स्पष्ट होणार आहे, असेही मेटे यांनी स्पष्ट केले.

खासगी कामानिमित्त कोल्हापुरात आलेल्या आमदार मेटे यांनी शासकीय विश्रामगृहावर कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. मेटे म्हणाले, गेल्या लोकसभा निवडणूकीपर्यंत शिवसंग्राम हा सामाजिक पक्ष होता, त्यानंतर तो राजकीय झाला आहे. पक्षाकडे एक आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत सदस्य अशी सत्तास्थाने आहेत. आगामी निवडणूकही लढवणार आहे. मित्रपक्ष असलेल्या भाजपसोबत जागावाटपासंदर्भात अनौपचारीक चर्चा झाली आहे. लोकसभेची एक आणि उर्वरीत विधानसभेच्या जागासंदर्भात लवकरच बैठक होणार आहे. भाजपनेही सकारात्मक प्रतिसाद दर्शवला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मेळाव्यात शेतकरी व शेतमजूर यांना दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळावी म्हणून राज्यभरातील 5 लाख शेतक-यांकडून भरुन घेतलेले अर्ज सादर करुन पेन्शनची मागणी केली जाणार आहे. याशिवाय सुशिक्षीत बेरोजगारांना नोकरी द्यावी, व्यवसायासाठी भांडवल द्यावे अन्यथा दरमहा पाच हजारप्रमाणे भत्ता द्यावा अशा मागणीचा ठराव केला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)