शिवरे येथे एक झाड माझे अभियान अंतर्गत वृक्षारोपण

कापूरहोळ- शिवरे (ता. भोर) येथे सिद्धीविनायक प्रतिष्ठानतर्फे 800 विविध जातीच्या रोपांचे वाटप व वृक्षारोपण मोठ्या उत्साहात करण्यात आले. हरित महराष्ट्र, विकसित महराष्ट्र या राज्य शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवड अभियानाअंतर्गत तब्बल 800 रोपांची यशस्वी लागवड करण्यात आली.

नसरापूर येथील सिद्धिविनायक प्रतिष्ठान व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 50 हेक्‍टर परिसरात विविध समाजिक संस्थेच्या सहकार्याने रोप लागवड करण्यात आली. यावेळी डॉ.राजेंद्र डीबळे, सामाजिक कार्यकर्ते समीर घोडेकर, सिद्धीविनायक संस्थेचे संचालक नारायण कोंडे, व्यवस्थापक योगेश गाडे, वन विभागाचे अधिकारी सचिन जधावर, वनरक्षक रोहन कोंडे, संतोष डीबळे, वर्षा इंगुळकर, मनाली कुलकर्णी, महेंद्र भोरडे, रवी कांबळे, मुकुंद पिसाळ, गणेश शितोळे, बाळासहेब फडतरे, शेखर डीबळे, छाया भगत, दीपक डीबळे, प्रशांत भोसले, प्रवीण डीबळे, प्रतीक शुक्‍ल, भलजीसिग कोचर, शाम डीबळे उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.