शिवपाल यादव यांची नवी आघाडी

लखनौ – समाजवादी पक्षाचे नेते आणि मुलायमसिंह यादव यांचे बंधु शिवपाल यादव यांनी समाजवादी सेक्‍युलर मोर्चा नावाची एक वेगळी राजकीय आघाडी स्थापन करण्याची घोषणा केली. सर्व छोट्या राजकीय पक्षांना आम्ही या आघाडीत सामाऊन घेणार आहोत असे त्यांनी म्हटले आहे. शिवपाल यादव हे अजूनही समाजवादी पक्षाचे विद्यमान आमदार आहेत. त्यांनी या नवीन आघाडी विषयी फार भाष्य करण्याचे टाळले. या मोर्चातर्फे सन 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली जाईल की नाही त्यांनी यावेळी स्पष्ट केले नाही.

आपली समाजवादी पक्षात उपेक्षा होत आहे. मी दोन वर्षे ही उपेक्षा सहन केली. पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमाला मला निमंत्रण दिले जात नाही किंवा पक्षाकडून आपल्यावर कोणतीही जबाबदारी सोपवली जात नाही अशी तक्रार त्यांनी आज पुन्हा आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना केली. मुलायमसिंह यादव हे या नवीन मोर्चात सहभागी आहेत काय असे विचारता ते म्हणाले की आम्ही त्यांना योंग्य तो सन्मान देत आहोत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बाकीच्यांनीही त्यांना योग्य तो सन्मान द्यावा अशी सुचना त्यांनी अखिलेश यादव यांचे नाव न घेता केली. आपण समाजवादी पक्षातून बाहेर पडणार आहात काय असे विचारता ते म्हणाले की मी बाहेर पडावे अशी अखिलेश यांची इच्छा आहे काय हे त्यांनाच जाऊन विचारा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)