शिवनेरी पॅंथर्स संघाची विजयी सलामी

पुणे – किरण नवगिरे (नाबाद 75 धावा व 20 धावांत 1 बळी) हिने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर शिवनेरी पॅंथर्स संघाने तोरणा टायगर्स संघाचा 9 गडी राखून पराभव करताना हेमंत पाटील महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी दिली. हेमंत पाटील स्पोर्टस फाउंडेशन व भारत अगेन्स्ट करप्शनच्या सहयोगाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

व्हिजन क्रिकेट अकादमी येथील क्रिकेट मैदानावर आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत पहिल्या साखळी सामन्यात शिवनेरी पॅंथर्स संघाने तोरणा टायगर्स संघाचा 9 गडी राखून सनसनाटी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना तोरणा टायगर्स संघाने 20 षटकांत 7 बाद 150 धावा केल्या. यात नेहा बडवाईकने 48धावा, चार्मी गवईने 37 धावा, रोहिणी मानेने 11 धावा व वैष्णवी शिंदेने 10 धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला. शिवनेरी पॅंथर्सकडून प्रियांका कुंभार 2-32, किरण नवगिरे 1-20, सायली लोणकर 1-24) यांनी सुरेख गोलंदाजी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिवनेरी पॅंथर्स संघाने विजयाचे आव्हान 14.4 षटकांत 1 बाद 151 धावा करून पूर्ण केले. यामध्ये किरण नवगिरेने 41 चेंडूंत 10 चौकार व 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 75 धावा व सायली लोणकरने 45 चेंडूंत 6 चौकारांच्या मदतीने नाबाद 51 धावांची खेळी करून संघाला एकहाती विजय मिळवून दिला. किरण नवगिरेला सामन्याची मानतकरी हा पुरस्कार देण्यात आला.

त्याआधी स्पर्धेचे उद्‌घाटन माजी रणजी खेळाडू विराग आवटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हेमंत पाटील स्पोर्टस फाउंडेशन चे अध्यक्ष हेमंत पाटील, नितीन सामल आणि जयंत भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

सविस्तर निकाल-
साखळी फेरी- तोरणा टायगर्स- 20 षटकांत 7 बाद 150 धावा (नेहा बडवाईक 48 (43), चार्मी गवई 37 (37),रोहिणी माने 11 (13), वैष्णवी शिंदे 10 (13), प्रियांका कुंभार 2-32, किरण नवगिरे 1-20, सायली लोणकर 1-24) वि.वि. शिवनेरी पॅंथर्स -14.4 षटकांत 1 बाद 151 धावा (किरण नवगिरे नाबाद 75 (41), सायली लोणकर नाबाद 51 (45), ख़ुशी मुल्ला 1-20); सामनावीर- किरण नवगिरे; सामन्याचा निकाल – शिवनेरी पॅंथर्स संघ 9 गडी राखून विजयी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)