शिवजयंतीनिमित्त आरोग्य तपासणी

जोगवडी- मोहरी बुद्रुक (ता. भोर) येथे ढोल-ताशांच्या गजरात शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोहरी बुद्रुक गावातील युवकांनी रोहिडेश्वर किल्ल्याहून गावापर्यंत ढोल-ताशांच्या गजरात शिवज्योत आणली. मुख्य रस्त्यापासून मारुती मंदिरापर्यंत श्री छत्रपती शिवरायांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आझाद तरुण मंडळ, भोलावडे येथील ढोल-लेझीम पथकाने आपले कौशल्य दाखविले. छोट्या चिमुकल्यांनी पोवाडे गायले यावेळी राजगड पोलीस स्टेशन नसरापूरचे सहाय्यक निरीक्षक दत्तात्रय दराडे, सचिन काळे यांनी उपस्थिती लावली. यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होऊन कार्यक्रमाची सांगता झाली

Leave A Reply

Your email address will not be published.