शिवचरित्रात मीपणाचा लवलेशही आढळत नाही !

  • प्रा. अरूण घोडके ः मॉडर्नच्या वसंत व्याख्यानमालेचे पहिले पुष्प

निगडी – ही तर श्रींची इच्छा या उक्‍तिनुसार शिवचरित्रात मीपणा कोठेही आढळत नाही, असे विचार प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. अरूण घोडके यांनी मॉडर्नच्या वसंत व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफताना व्यक्‍त केले. शिवरायांचे आठवावे रूप या विषयावर त्यांनी अभ्यासपूर्ण तिथीपुराव्यासह सादर केलेले प्रसंग व विशिष्ट उच्चारणशैली मुळे उपस्थितांना आपण शिवकाल समोर पाहत असल्याची अनुभूती घडली.

या प्रसंगी व्याख्यानमालेचे उदघाटक म्हणून उपमहापौर शैलजा मोरे यांनी संस्थेच्या या प्रबोधनात्मक उपक्रमाचे कौतुक केले व नागरिकांना त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. संस्थेचे उपकार्यवाह शरद इनामदार यांनी प्रास्ताविकात व्याख्यानमालेची उद्दिष्ट्‌ये विशद केली. यावेळी व्यासपीठावर सह शहर अभियंता प्रविण तुपे, संस्थेचे सदस्या अमिता किराड, डॉ. प्रविण चौधरी, राजीव कुटे, प्रशालेचे प्रमुख पांडुरंग मराडे, संगिता घुले, गौरी सावंत, तृप्ती वंजारे आदी उपस्थित होते.

प्रा. अरूण घोडके पुढे म्हणाले की शिवचरित्रात मी पणाचा कोठेही लवलेश सापडत नाही, सापडते ते महारांजांचे अलौकिक बुद्धीचातुर्य, दूरदृष्टी प्रेम निष्ठा, आणि सुराज्याची तळमळ. तेव्हा प्रत्येकाने आज शिवचरित्राचे चिंतन करणे गरजेचे आहे.
प्रा. घोडके यांनी वास्तुविशारद हिरोजी इंदुलकर यांचे प्रसंग, आग्रा भेट, अफझलखान भेट, विविध तहाचे प्रसंग, यामधील अपरिचित वर्णने सादर केली. ते म्हणाले, शिवा काशिद, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, आदी शिवराज्यातील माणसे धाडसी पण प्रामाणिक होती. पुरषार्थाची प्रचंड उर्मी होती, आज अशी माणसे दिसत नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी अरबी चाच्यांविरूदध केलेल्या कारवाईमुळे आजही दहशतवादाशी लढताना शिवचरित्राचा अभ्यास करणे गरजेचे आहे. चार पावले पुढे जायचे असेल तर दोन पावले मागे यावे लागते हे शिवचरित्राने आम्हाला सांगितले आहे . शेवटी त्यांनी प्रतापराव गुजर यांचे सह सात वेड्या मावळ्यांनी दिलेल्या एकाकी झुंजीचे वर्णन करत असताना, वेडात निघाले वीर मराठे सात हे अजरामर काव्य सादर करून सर्वांच्या नसा-नसांमध्ये वीररसाचा संचार घडवून आणला. सूत्रसंचालन शिवाजी अंबिके यांनी केले तर आभार मनिषा बोत्रे यांनी मानले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)