शिर्डीतील आगीत 15 लाखांचे नुकसान

स्थानिक रहिवाशांनी मदत केल्याने मोठी दुर्घटना टळली
शिर्डी – शिर्डीपासून काही अंतरावर असलेल्या शिर्डी-साकुरी शिवेलगत असणाऱ्या एका इमारतीस भर दुपारी लागलेल्या आगीत स्कॉपिर्ओ गाडी, डाळिंबाचे कॅरेट जळून खाक झाले. शिर्डी-राहाता नगरपालिकेच्या बंबांनी आग वेळीच आटोक्‍यात आणली. जवळपास राहणारे रहिवाशी मदतीला धावल्याने मोठी दुर्घटना टळली. आगीत सुमारे 15 लाख रुपयांचे नुकसान झाले असले, तरी सुदैवाने जीवित हानी टळली. शनिवारी दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, की शिर्डी-साकुरी शिवेलगत आंध्र प्रदेश राज्यातील रंगनाथ गंधम यांची इमारत आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर डाळिंबाच्या व्यापाऱ्याचे कॅरेट तसेच भुसा होता. वरच्या मजल्यावर चार कुटुंबे राहतात. दुपारी दोनच्या सुमारास अचानक आग आगली. आगीने क्षणात रौद्ररुप धारण केले. पार्किंगमध्ये उभी असलेल्या स्कॉर्पिओ गाडीस आग लागल्याने ही गाडी आगीत जळून भस्मसात झाली. डाळिंबाचे कॅरेट जळून गेले. गाडीसह सुमारे 15 लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीचे धुराचे लोळ दूरवरून दिसल्याने जवळपास राहणारे नागरिक मदतीला धावले. या ठिकाणी राहणाऱ्या कुटुंबास सुरक्षित ठिकाणी हलविणे, गॅस टाक्‍या घरातून बाहेर काढण्याचे काम केले. या वेळी नगरसेवक सचिन कोते, पत्रकार वाल्मिकराव बावचे, साई संस्थानचे प्रताप कोते, अरविंद कोते, किशोर कोते, कैलास कोते यांच्यासह नागरिक मदतीला धावून आले. शिर्डी व राहाता नगरपंचायतीच्या अग्नीशामक बंबास कळविल्याने दोन्ही बंब क्षणात हजर झाले.
शिर्डी नगरपंचायतीचे अग्नीशामक अधिकारी विलास लासुरे तसेच दगु खरात, अशोक गांगुर्डे, विजय गायकवाड यांनी शर्थीचे प्रयत्न करून वेळीच आग आटोक्‍यात आणल्याने जवळपासच्या अन्य दोन इमारती तसेच सदर इमारतीच्या वरच्या बाजूस असणाऱ्या रुम आगीपासून बचावल्या. एक तासानंतर आग आटोक्‍यात आणण्यात अग्नीशामक दलास यश आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)