शिरोली-वांद्रा रस्ता उखडू लागला

पाईट-खेड तालुक्‍यातील पश्‍चिम भागात अतिशय महत्त्वाचा असलेला शिरोली ते वांद्रे रस्त्याचे काम 75 टक्के पूर्ण झाल्याचे दिसून येते; परंतु या रस्त्याचे काम निकृष्ट पद्धतीचे झाले असल्याचे दिसून येत आहे. चार दिवसांपूर्वी झालेल्या रिमझिम पावसात साइडपट्ट्या तग धरू शकल्या नाहीत. त्या पाण्याबरोबर वगळल्याचे चित्र असल्याने या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह जाणकारांनी व्यक्त केले आहे.
शिरोली- पाईट- वांद्रे हा जिल्हामार्ग खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील नागरिकांचा प्रवास सुखाचा व्हावा यासाठी आमदार सुरेश गोरे यांनी 5.50 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला व प्रत्यक्षदर्शी या रस्त्याचे पूर्णत्त्वाकडे जात असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते; परंतु रिमझिम पावसातच साईडपट्ट्या वगळू लागल्याने रस्ता सुद्धा जास्त दिवस तग धरू शकणार नाहीत. यामुळे कामाबाबत नागरिक साशंक आहेत.
गेले तीन चार वर्षे या रस्त्याकडे कोणीही लक्ष न दिल्याने तीन तेरा वाजले होते. तीन वर्षांच्या कालावधीनंतर या रस्त्याचे काम वेगाने चालू झाले; परंतु पुढे रस्त्याचे काम चालू आणि मागे रस्ता उखडण्यास सुरुवात झाल्याने दिवसागणिक नागरिकांचे समाधान लोप पावू लागले आहे. या भागात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. रिमझिम पावसात वगळलेल्या साईडपट्ट्या दमदार पावसात तग धरुच शकत नाही व साईडपट्ट्या खचल्यानंतर रस्त्याची अवस्था जैसे थेच होणार, असे जाणकारांचे मत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
1 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)