शिरूर-हवेलीतील “राष्ट्रवादी’चे मातब्बर शिवबंधनात

तालुक्‍यातील 40 जणांसह कार्यकर्त्यांचा “मातोश्री’वर शिवसेनेत प्रवेश

शिरूर/लोणी काळभोर- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शिरुर-हवेली मतदारसंघात शिवसेनेने मोठी मुसंडी मारली आहे. या मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते आजी, माजी सरपंच, माजी जिल्हा परीषद सदस्य, साखर कारखान्यांचे आजी, माजी संचालक, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे आजी, माजी अध्यक्ष व संचालक अशा तब्बल 40 जणांनी आज मुंबईत मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मा. खासदार, उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, जि.प.सदस्य माऊली कटके यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी झालेल्या विशेष कार्यक्रमात शिवबंधन बांधून सर्वांचे पक्षात स्वागत करण्यात आले. या पक्षप्रवेशामुळे शिरूर-हवेली मतदारसंघातील शिवसेनेची ताकद प्रचंड वाढली आहे.

हवेली तालुक्‍याच्या राजकारणात यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माधव काळभोर व जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांचे विश्वासू म्हणून प्रशांत दत्तात्रय काळभोर यांची तालुक्‍यात ओळख आहे. काळभोर यांच्या गटाची मागील काही वर्षांपासुन लोणी काळभोर ग्रामपंचायत व लोणी काळभोर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेवर सत्ता आह, त्यांच्या सहकाऱ्यांची भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार बाबुराव पाचर्णे यांच्याशीही जवळीक आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासुन काळभोर व त्यांच्या सहकाऱ्यांचा भाजप मध्ये प्रवेश होईल, अशी चर्चा होती. मात्र, लोकसभा निवडणुकीत प्रशांत काळभोर यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचार धुरा एकहाती सांभाळली होती. त्यामुळे शिवसेनेचे किंगमेकर ठरलेले जिल्हा प्रमुख माऊली कटके यांनी शिरूर-हवेलीतील मातब्बरांना शिवसेनेत घेण्यासाठी फिल्डींग लावली होती. यात कटके यांना यश आले.

शिवसेनेत प्रवेश केलेल्या मातब्बरांपैकी हवेलीमधून प्रशांत काळभोर यांच्यासह माजी जिल्हा परीषद सदस्य संजय गायकवाड, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक प्रताप बोरकर, हवेली तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष राजेश काळभोर, लोणी काळभोरच्या सरपंच अश्विनी गायकवाड, माजी सरपंच वंदना काळभोर, ग्रामपंचायत सदस्य बाळासो काळभोर, विजय ननवरे, पांडुरंग केसकर, रेखा काळभोर, मंगल बनकर, संगीता काळभोर, लोणी काळभोर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या उपाध्यक्षा अनिता काळभोर, संस्थेचे माजी अध्यक्ष हेमंत गायकवाड, ज्ञानेश्वर काळभोर, संस्थेचे संचालक राहुल काळभोर, अमर काळभोर, धोंडिबा काळभोर, विलास काळभोर, बाजीराव काळभोर, राजेंद्र केसकर, उद्योजक राहुल काळभोर, आळंदी म्हातोबाच्या माजी सरपंच नीता क्षीरसागर आदी हवेली तालुक्‍यातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला.

तर, शिरूर तालुक्‍यातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधीर फराटे यांनीही शिव बंधन बांधल्याने शिरूरच्या पूर्व भागात राष्ट्रवादीची पडझड झाली आहे, त्यांच्याबरोबर माऊली सोसायटी मांडवगण फराटा अध्यक्ष रवींद्र फराटे. सुधीर फराटे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार अशोक पवार यांचे निकटवर्तीय मानले जात होते; परंतु, गेल्या चार-सहा महिन्यापासून दोघांमध्ये कुजबुज निर्माण झाली होती. त्यातूनच हा पक्ष प्रवेश झाल्याचे बोलले जात आहे.

यासह तालुक्‍यातून रावसाहेब जगताप, अशोक जगताप, संचालक कृष्णराव फराटे, संचालक अप्पासाहेब फराटे, समीर फराटे, कैलास फराटे, रत्नाकर फराटे, करंजवणे ग्रामपंचायतींचे उपसरपंच योगिराज शिंदे, निलेश इथापे, मच्छिंद्र जाधव, सुरेश सोनावणे आदींनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यातून शिरूर तालुक्‍यात शिवसेनेची पूर्व भागात ताकत नक्‍कीच वाढणार आहे. शिरूर मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लक्ष घालून पक्षबांधणीवर भर दिला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये आपले स्थान भक्‍कम करीत असून अनेक दिग्गज मंडळी शिवसेनेकडे वळल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

  • ज्ञानेश्‍वर कटकेंची ताकद वाढली…
    शिवसेना जिल्हा प्रमुख ज्ञानेश्‍वर माऊली कटके हे शिरूर विधानसभा मतदारसंघांमध्ये इच्छुक असून आजच्या प्रक्ष प्रवेशाने त्यांची ताकद नक्‍कीच वाढली आहे. तर माजी खासदार व शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये पक्षवाढीसाठी स्वतःला झोकून दिल्याचे व शिवसेना पक्षाची ताकद वाढवण्याचे काम योग्य दिशेने सुरू केली असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.