शिरूर तालुक्‍यात 6 ग्रामपंचायतीसाठी शांततेत मतदान

तहसीलदार रणजीत भोसले यांची माहिती : आज तहसील कार्यालयात मतमोजणी

शिरूर: शिरूर तालुक्‍यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या रांजणगाव गणपती, करडे, आंबळे, ढोकसांगवी, चव्हाणवाडी, कळवंतवाडी या ग्रामपंचायतीत बुधवारी (दि.26) शांततेत मतदान पार पडले. कुठलाही अनुचित प्रकार या निवडणुकीमध्ये झाला नसून सरासरी या सहा ग्रामपंचायतीत 89 : 12 टक्के मतदान झाल्याची माहिती शिरूरचे तहसीलदार रणजीत भोसले यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या ग्रामपंचायतीमधून सरपंच पदासाठी 15 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. तर सदस्य पदासाठी 112 उमेदवार निवडणूक रिंगणात मध्ये उभी होते. या सर्वांचे भवितव्य बुधवारी (दि.26) पेटी बंद झाले आहे. शिरूर तालुक्‍यातील या ग्रामपंचायतीमध्ये झालेले मतदान पुढीलप्रमाणे : रांजणगाव गणपती 87.57 टक्के, करडे 87.60टक्के, आंबळे 92.33 टक्के, ढोकसांगवी 91.71 टक्के, चव्हाणवाडी 90.76 टक्के, कळवंतवाडी 89.31 टक्के, तर धानोरे ही ग्रामपंचायत बिनविरोध झालेली आहे.

दरम्यान, शिरुर तालुक्‍यातील महत्वाच्या या ग्रामपंचायती असल्याने संपूर्ण तालुक्‍याचे या निवडणुकीकडे लक्ष लागले असून या चारही ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी-भाजप अशी सरळ लढत होत आहे. आंबळे येथील ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार बाबूराव पाचर्णे यांचे स्वीय सहाय्यक महेश बेंद्रे हे थेट सरपंचपदाचे उमेदवार होते. त्यामुळे या ग्रामपंचायतीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. सकाळी सात वाजल्यापासून प्रत्येक ग्रामपंचायतीच्या मतदानासाठी मतदारांनी गर्दी केली होती. तर दुपारी हे प्रमाण काहीसे कमी झाले होते.दुपारी चारनंतर मतदारांनी मतदान करण्यासाठी जोर धरला होता. सायंकाळी साडेपाचपर्यंत सरासरी 90 टक्के मतदान सर्वञ पार पडले. प्रत्येक गावात मतदान केंद्राबाहेर उमेदवार आणि समर्थक हे जास्तीत जास्त मतदान करुन घेण्यासाठी उभे असल्याचे घोळक्‍यांनी दिसून येत होते.

 असा होता बंदोबस्त

विशेष म्हणजे कोठेही अनुचित प्रकार न घडता शांततेत या चारही ग्रामपंचायतीचे मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीकामी शिरुर पोलीस स्टेशन हद्दीत एक उपविभागीय पोलीस अधिकारी, तीन पोलीस निरीक्षक, सात सहायक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक, 75 पोलीस पुरूष आणि महिला कर्मचारी, एक स्ट्राईकिंग फोर्स, एक दंगल नियंञण पथक आणि होमगार्ड असा तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 कोठेही अनुचित प्रकार नाही

गुरूवारी (दि.27 ) सकाळी 10 वाजता शिरुर तहसील कार्यालयातील सभागृहात मतमोजणी होणार आहे.दिवसभर कोठेही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून शिरुरचे तहसीलदार रणजित भोसले आणि सहकारी तसेच शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांनी लक्ष ठेवले होते. त्यामुळे संवेदनशील असलेल्या करडे, चव्हाणवाडी, आंबळे या तीन ग्रामपंचायतीत शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)