शिरूर तालुक्‍याच्या पूर्व भागात पावसाची दडी

  • शेतकरी वर्ग चिंताग्रस्त : खरीप हंगाम वाया जाण्याची भीती

न्हावरे – शिरुर तालुक्‍याच्या पूर्व भागात अद्यापपर्यंत पावसाने दडी मारल्याने तालुक्‍याच्या पूर्व भागातील शेतकरी चिंताग्रस्त असून, शेतकरी वर्ग पावसाच्या प्रतीक्षेत आहे.तर पुढील आठवडा भरात चांगला पाऊस नाही झाला तर, खरीप हंगाम वाया जाण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर येऊ शकते.
शिरुर तालुक्‍याच्या शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य स्त्रोतापैकी चासकमानचे पाणी सोडण्यात आले मात्र, ते पाणी पहिल्यांदा टेलकडे म्हणजेच शेवटच्या टोकाला जाणे अपेक्षित होते. परंतु, संबंधित चासकमान विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या चुकीच्या नियोजनामुळे ते पाणी टेलकडे पोहोचले नाही, असा आरोप शेतकरीवर्ग करीत आहेत.
तसेच शिरूरच्या काही भागाला चिंचणी येथील घोड धरणाचे पाणी वरदान ठरत आहे. मात्र, सध्या घोड धरणात पाणी सोडल्यामुळे धरणाचा पाणीसाठा 26 टक्के इतका झाला असून या धरण क्षेत्रातील शेती धोक्‍यात आली आहे. तर परिसरातील शेतकऱ्यांनी धरणातून कालव्यावाटे जनावरांच्या चाऱ्यासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी पाणी सोडावे, अशी मागणी केली आहे. तसेच घोड धारणावरून रांजणगाव गणपती औद्योगिक वसाहतीला होणार पाणीपुरवठा बंद करावा, अशीही मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. त्यामुळे पूर्व शिरुर तालुक्‍यात पावसाने आणखी ओढ दिल्यास दुष्काळाचे चित्र आणखी गडद होणार आहे. तसेच ऊस, बाजरी, मूग, जनावराचा चारा पिके ही पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. तर पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू शकते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)