शिरूर तालुका कॉंग्रेसच्या अध्यक्षासह कुटुंबीयांना मारहाण

शिक्रापूर- येथे सणसवाडीच्या मुख्य चौकात किरकोळ कारणावरून शिरूर तालुका कॉंग्रेसचे तालुकाध्यक्षांसह त्यांच्या कुटुंबीयांना गजाने गंभीर मारहाण करण्यात आली. यात तालुकाध्यक्षांसह त्यांच्या कुटुंबतील चौघांसह एका पानटपरीचालक जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 27) रात्रीच्या सुमारास घडली असून याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंकज गायकवाड (रा. सणसवाडी, ता. शिरूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यामारहाणीत कॉंग्रेस तालुकाध्यक्ष वैभव यादव, सुनिता वैभव यादव, स्नेहल वैभव यादव, कल्पना विजय यादव, पानटपरी चालक धर्मेंद्र पुलकित सिंह (सर्व रा. सणसवाडी ता. शिरूर) असे जखमी झालेल्यांची नावे असून पानटपरीचालक सिंह यांनी फिर्याद दिली आहे. याबाबतची माहिती अशी की, वैभव यादव यांच्या सणसवाडी येथील जागेमध्ये धर्मेंद्रसिंह यांची पानटपरी आहे. शुक्रवारी रात्री पंकज गायकवाड हा पानटपरीवर व विमल मागितला त्यावेळी विमल नसल्याचे सिंह यांनी सांगितले. त्यामुळे चिडलेल्या पंकजने पाच मिनटात येतो व तुझ्याकडे बघतो असे सांगितले. त्यानंतर काही वेळाने पंकज पुन्हा आला आणि सिंह यांच्या टपरीतील वस्तू अस्ताव्यस्त फेकून दिल्या व सिंह यांना गजाच्या सहायाने करण्यास सुरुवात केली. त्यावेळी वैभव यादव हे भांडणे सोडविण्यासाठी आले असता पंकजने त्यांना देखील गजाने मारहाण केली. यादव यांना मारहाण होत असल्याचे पाहून त्यांच्या घरातील सुनिता , स्नेहल, कल्पना या महिला धावत आल्या व हे भांडण सोडविण्याचा प्रयत्न करीत होत्या, त्यावेळी पंकजने या महिलांनाही गजाने, लाथाबुक्‍य्यांनी मारहाण केली, त्यामध्ये कल्पना यादव या गंभीर जखमी झाल्या आहेत. दरम्यान, सणसवाडी येथील चौकात मारहाण होत असल्याच्या घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सदाशिव शेलार यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह तातडीने सणसवाडी चौकात धाव घेत परिस्थिती आटोक्‍यात आणली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक जयप्रकाश चव्हाण करीत आहे.

  • नेत्यांची पोलीस ठाण्यात गर्दी
    सणसवाडी येथे तालुकाध्यक्ष वैभव यादव यांना मारहाण झाल्याच्या घटनेची माहिती मिळताच शिरूर तालुक्‍यातील कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसह, तालुक्‍यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी तसेच स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)