शिरूरमध्ये मनसेने नगरपारिषदेसमोर खेळला खेळ

शिरूर- शिरूर शहरातील खेळाडूंना अत्याधुनिक क्रीडांगण उपलब्ध व्हावे, या मागणीसाठी शिरूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने क्रीडा दिनाचे औचित्य साधून शिरूर नगरपालिका कार्यालयाच्या बाहेर क्रिकेट, कबड्डी यांसह विविध खेळ खेळून क्रीडांगणाची मागणी नगरपरिषदेकडे करून नगरपालिकेचे लक्ष वेधले. यावेळी मुख्याअधिकारी अलेस पोरे यांना निवेदन देण्यात आले.
त्या आगळ्यावेगळ्या आंदोलनामुळे नागरिकांनी नगरपरिषदेसमोर मोठी गर्दी केली होती. शिरूरमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. अनेक खेळाडू या मातीमध्ये तयार झाले आहेत. मात्र, आजपर्यंत या या खेळाडूंसाठी अत्याधुनिक किंवा साधेसुद्धा मैदान उपलब्ध नसल्याने चांगले खेळाडू तयार होत नाहीत. तसेच अनेक खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय पातळीवर मजल मारलेली आहे. परंतु या नगरपरिषदेचे लक्ष नसल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिले. तसेच या परिषदेसमोर खेळ खेळून क्रीडांगणाच्या मागणीकडे लक्ष वेधले.
नागरिकांनी आगळ्यावेगळ्या आंदोलनाचे कौतुक करून त्याला पाठिंबा दर्शविला आहे. सकाळी 11 च्या दरम्यान नगरपरिषदेच्या खाली क्रिकेट ड्रेस घालून मनसे मनसे कार्यकर्ते उपस्थित राहिले होते. प्रथम त्यांनी क्रिकेटचा खेळ खेळला.
मनसेचे उपजिल्हाध्यक्ष महिबूबभाई सय्यद, मनसेचे शहराध्यक्ष संदीप कडेकर, मनविसेचे शहराध्यक्ष अविनाश घोगरे, मनविसेचे तालुकाध्यक्ष स्वप्नील माळवे, मनसेचे तालुका संघटक कांतीलाल शर्मा, मनसेचे वाहतूक अध्यक्ष रविंद्र गुळादे आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)