शिरूरमध्ये टपाल कार्यालयात गैरसोय

शिरूर- शिरूर शहरात असल्याने टपाल कार्यालयात गेल्या अनेक दिवसापासून टपालाचे तिकीट, पोस्टकार्ड सर्व गोष्टी नसल्याने गैरसोय होत आहे. याबाबत बुधवारी (दि.26) शिरूर शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पोस्टमास्टर यांना निवेदन देऊन दोन दिवसात सर्व गोष्टी पूर्ण न झाल्यास शिरूर टपाल कार्यालयाला कुलूप लावण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून शहरात असे हे टपाल कार्यालयांमध्ये पोस्टकार्ड, टपालाचे तिकीट आणि इतर स्टेशनरी उपलब्ध नसल्याने नागरिक, विद्यार्थी यांचे मोठे हाल होत आहे. या सर्व गोष्टी गेल्या दोन महिन्यांपासून या कार्यालयात नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बुधवारी (दि.26) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयाने सुरू पोस्टमध्ये धडक देऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले. तसेच टपाल अधिकाऱ्यांनी याबाबत वरिष्ठांकडे आणि पत्रव्यवहार केला असून वरिष्ठांकडून या गोष्टी मिळत नसल्याचे सांगितले.
यावेळी शिरूर शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सावळागोंधळ आणि मनमानी कारभाराचा निषेध केला. यावेळी मनसे शहराध्यक्ष संदीप कडेकर, मनविसे शहराध्यक्ष अविनाश घोगरे, मनविसे तालुका अध्यक्ष स्वप्नील माळवे, बंडू दुधाणे, नौशाद शेख आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)