शिरूरजवळ अपघातात एकाचा मृत्यू, चौघे जखमी

शिरूर-शिरूर बायपासजवळ ब्रिझा कार दुभाजकाला धडकून एकाचा मृत्यू तर चारजण जखमी झाल्याची घटना घडली.
अरविंद ताडगे असे मृत्यू झालेल्याचे नाव असून गणेश शिंदे, गोकुळ बर्गे, इरफान सय्यद व गुप्ता टेलर अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी गणेश एकनाथ शिंदे (रा. शिवरक्षा कॉलनी, रामलिंग रोड शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी (दि. 27) गणेश शिंदे हे रात्री अकरा वाजता स्वत:चे दुकान बंद करून अरविंद ताडगे, गोकुळ बर्गे, इरफान सय्यद व गुप्ता टेलर यांच्यासोबत ब्रिझा कारमध्ये (एमएच 12 एनयू 8789) बसून जेवण करण्यासाठी गव्हाणवाडी (ता. श्रीगोंदा) येथील एका हॉटेलवर गेले. तेथून जेवण झाल्यानंतर अहमदनगर-पुणे रस्त्याने शिरूरकडे येत असताना शिरूर बायपास जवळील रिलायन्स पंपासमोर डिव्हायडर जवळ आले असता अचानक कार डिव्हायडरवर चढली व अपघात झाला. यावेळी अरविंद ताडगे, इरफान सय्यद, गुप्ता टेलर यांच्या हातापायास, डोक्‍यास गंभीर दुखापत झाली. तर फिर्यादीचा डावा पाय फ्रॅक्‍चर झाला आहे. हा अपघात रात्री दोनच्या सुमारास घडला आहे. या अपघातानंतर गंभीर जखमी असलेल्या अरविंद ताडगे यांना पुढील उपचारांसाठी पुणे येथे दाखल करण्यात आले होते; परंतु ताडगे यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला असून, घटनेचा पुढील तपास शिरुर पोलीस ठाण्याचे वैभव मोरे हे करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)