शिरढोणमध्ये इसमाची दारुच्या नशेत आत्महत्या

कोरेगाव, दि. 31 (प्रतिनिधी) – कोरेगाव तालुक्‍यातील शिरढोण येथील श्रीमंत बाबुराव पवार (वय 55) यांनी दारुच्या नशेत घरातील लोखंडी अँगला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, श्रीमंत बाबुराव पवार हे पत्नी सौ. विजया, मुलगा संतोष, सून वैशाली व दोन नातवंडे यांच्या सोबत राहत होते. त्यांना दारूचे व्यसन असल्याने ते दररोज दारू पित असे. सोमवार, 30 रोजी श्रीमंत पवार हे रात्री 8 च्या सुमारास बाहेरून फिरून येऊन जेवण करून घरात झोपले होते. मंगळवारी सकाळी घरातील लोकांनी सकाळी 6 वाजता दाराची कडी वाजवून उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु आतून काही प्रतिसाद न मिळल्यानर ग्राइंडरने बेडरूमची कडी कोयंड्याची नटे तोडून दरवाजा उघडला. बेडरूममध्ये कोणी दिसले नाही, त्यामुळे किचनची पाहणी केली असता त्याठिकाणी श्रीमंत बाबुराव पवार यांनी लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दिसून आले. याबाबत कोरेगाव पोलीस ठाण्यात नोंद दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपस करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)