शिनोलीत सांडपाणी, मलमूत्र रस्त्यावर

भीमाशंकर-शिनोली (ता. आंबेगाव) ग्रामपंचायतीने सार्वजनिक स्वच्छतागृहांचे मलमूत्र व एका मोठ्या गृहप्रकल्पाचे सांडपाणी मंचर -भीमाशंकर रस्त्यावर सोडले असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. मात्र, शिनोली ग्रामपंचायतीने तीन महिन्यांपूर्वी मंचर-भीमाशंकर रस्त्यावरील अतिक्रमणे काढली. ती अतिक्रमणे काढत असताना बेजबाबदारपणे रस्त्याच्या एका बाजूने असणारे सुव्यवस्थित सांडपाण्याचे गटार दुसरी व्यवस्था न करता बुजवून टाकले. त्यामुळे सार्वजनिक स्वच्छतागृहाचे मलमूत्र व गृहप्रकल्पाचे सांडपाणी मोठ्या प्रमाणावर वाहत असून रस्त्यावर पाणी साचत आहे. त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, तरीही ग्रामपंचायत यावर कोणतीही पाऊले उचलत नसल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत.
सांडपाणी साचल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला असून साथीचे रोग पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे.
याबाबत माजी ग्रामपंचायत सदस्य संदीप ढेंरगे म्हणाले की, शिनोली ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक मनमानी कारभार करत असून वेळोवेळी विनंती करूनी ही सांडपाण्याची व्यवस्था करत नाही.
येत्या दोन दिवसांत सांडपाण्याची व्यवस्था न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे तंटामुक्‍ती अध्यक्ष दामुराजे बोऱ्हाडे, संदीप ढेरंगे, स्वामी समर्थ विचार मंचचे अध्यक्ष दत्तात्रय बोऱ्हाडे यांनी केले आहे. याबाबत ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास असमर्थता दाखविली.

  • भाविक पर्यटकांना त्रास
    भीमाशंकर देवस्थान हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ असून बाराम ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. त्यामुळे या रस्त्यावरून हजारो वाहने रोज वाहने ये-जा करत असतात. रस्त्यावर साठलेल्या पाण्यामुळे वाहनांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे भीमाशंकर येथे येणाऱ्या भाविकांना व पर्यटकांना त्रास सहन करावा लागत आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)