शिक्षण उपसंचालकाकडे लाखोंचे घबाड

तब्बल 46 लाख रुपयांचे घबाड हाती

पुणे – नाशिक येथील विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र नामदेव जाधव यांच्याकडे 46 लाख 82 हजार रुपयांची बेहिशेबी मालमत्ता (अपसंपदा) असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांच्यावर पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रामचंद्र जाधव (वय – 57 वर्षे) यांच्या नोकरीच्या 15 जून 1985 ते 31 मार्च 2012 या कालावधीतील मालमत्तेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उघड चौकशी सुरू केली होती. या चौकशीत पुणे, नाशिक, कोल्हापूर या ठिकाणी जाधव यांच्याकडे एकूण 43 लाख 82 हजार 403 रुपयांची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे निष्पन्न झाले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपायुक्त संदीप दिवाण, अपर पोलीस उपायुक्त दिलीप बोरस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त दत्तात्रय भापकर यांनी सरकारतर्फे चंदननगर येथील पोलीस ठाण्यात जाधव यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. यावरुन जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपक प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.

पुणे, अहमदनगर, नाशिक येथील जाधव यांच्या बेहिशेबी मालमत्तेची विशेष पथकामार्फत तपासणी सुरू आहे. या मालमत्तेत शेती, फ्लॅट, वाहने यांच्यासह इतर मालमत्तेचा समावेश असून त्यांचे पुरावे जमा करुन पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू असून ही मालमत्ता आणखी वाढण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त दत्तात्रय भापकर यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)