शिक्षणसम्राट शिवाजीराव जोंधळे यांची मुलाविरोधातच तक्रार

सीआयडीकडून गुन्हा दाखल : समर्थ समाज संस्थेत 41 लाखांचा गैरव्यवहार


सागर जोंधळेसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

कल्याण – शिक्षणसम्राट अशी ओळख असलेल्या शिवाजीराव जोंधळे यांना त्यांच्या मुलानेच फसवल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सीआयडीने तपास करुन गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी नुकतेच कल्याण न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

शिवाजीराव जोंधळे यांची “समर्थ समाज संस्था’ ही शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेत त्यांचा मुलगा सागर जोंधळे, पत्नी वैशाली जोंधळे हे पदाधिकारी आहेत. या दोघांसह संस्थेच्या इतर विश्वस्तांनी संगनमत करुन संस्थेचे बनावट मिनिट बुक तयार केले आणि संगनमताने 41 लाख 81 हजार रुपयांचा गैरव्यवहार केला. या पैशातून सागर जोंधळे याने स्पीडबोट विकत घेतली. इतकेच नव्हे, तर अध्यक्ष असलेल्या शिवाजीराव जोंधळे यांनाही बाजूला करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप स्वतः शिवाजीराव जोंधळे यांनी केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत जोंधळे यांनी तक्रार केल्यानंतर सीआयडीकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला होता. याप्रकरणी सीआयडीने तपास करत सागर जोंधळे, वैशाली जोंधळे यांच्यासह एकूण सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच कल्याण न्यायालयात या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले. आपली फसवणूक करणाऱ्यांवर न्यायालयाने कडक कारवाई करावी, अशी मागणी शिवाजीराव जोंधळे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)