शिक्षणमंत्र्यांशी चर्चा निष्फळ; प्राध्यापकांचा संप कायम

मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी : उच्च शिक्षण विभागाने मागितली प्राध्यापकांची हजेरी

पुणे – राज्यातील प्राध्यापकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली असे जरी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले असले तरीही आमचे कोणतेही मुद्दे मान्य झालेले नाहीत. त्यामुळे हा बेमुदत संप आम्ही सुरूच ठेवणार असल्याचे प्राध्यापकांनी जाहीर केले. दरम्यान प्राध्यापकांच्या या आंदोलनाला राज्यातून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्राध्यापकांच्या संघटनांच्या सदस्यांसोबत उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची मुंबईत मंगळवारी बैठक झाली होती. या बैठकीत सकरात्मक चर्चा झाल्याचे शिक्षणमंत्र्यांकडून सांगण्यात आले होते. मात्र, प्राध्यापकांनी आपली भूमिका बैठकीचे इतिवृत्त मिळेपर्यंत राखून ठेवली होती. अखेर बुधवारी इतिवृत्त आल्यानंतर आम्ही संप सुरूच ठेवणार असल्याची भूमिका संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.

दरम्यान, राज्यातील प्राध्यापकांनी आपल्या मागण्यांसाठी सोमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. या मागण्यांमध्ये सातवा वेतन आयोग, पद भरतीचा विषय, 71 दिवसाच्या प्राध्यापकांच्या संप काळातील वेतन, विनाअनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या वेतन आदी विषय आहेत.

संप काळातील वेतनही आता कापणार?
एकीकडे प्राध्यापकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे सरकारकडून सांगितले जात असताना उच्च शिक्षण विभागाने मात्र, महाविद्यालयांना संप दरम्यान प्राध्यापकांच्या हजेरीचा अहवाल पाठविण्यास सांगितले आहे. त्यामुळे संपकाळातील 71 दिवसांचे वेतन मिळावे या मागणीसाठी संप करणाऱ्या प्राध्यापकांचे हे देखील वेतन कापणार असल्याची चिन्हे आता दिसत आहेत.

इतिवृत्तात आमच्या मागण्या मान्य झाल्याचे नमूद केले असेल, अशी आम्हाला आशा होती. मात्र, इतिवृत्तात प्रत्येक गोष्टीत शिक्षणमंत्र्यांनी केवळ आश्‍वासन दिले आहे. त्यामुळेच आता आम्ही हा संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला असून मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालावे अशी आमची मागणी आहे.
– डॉ. शामकांत लवांडे, सरचिटणीस, महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी अॅन्ड कॉलेज टिचर्स ऑर्गनायझेशन (एमफुक्‍टो)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)