शिक्षक हेच खरे देशाचे भाग्यविधाते

डॉ. कणकवलीकर ः शिरूरमध्ये प्रजासत्ताकदिनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कोरेगाव भीमा-मरगळ झटकून टाका, अहंकार टाळा, जोश व उत्साह वाढवा. पालक हेच विद्यार्थ्यांचे पहिले शिक्षक आणि शिक्षक हेच खरे देशाचे भाग्यविधाते आहेत. आपण स्वातंत्र्याचा आनंद घ्या, वाघ-सिंहासारखे जीवन जगा, आत्मविश्वास वाढवा, प्रत्येक काम नियोजनपूर्वक करा, योग्य क्षेत्राची निवड करा, मोठी स्वप्न पहा आणि स्वप्नांच्या पुर्तीसाठी अखंड प्रयत्न करा, असे आवाहन “मी विजेता होणारच’ या पुस्तकाचे लेखक डॉ. उमेश कणकवलीकर यांनी विद्यार्थ्यांना केले.
बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या बालाजी इंग्लिश मिडीयम स्कूल आणि बालाजी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय यांचा संयुक्त कार्यक्रम बालाजी शैक्षणिक संकुल रामलिंग रोड शिरूर येथे अत्यंत उत्साहात पार पडला. यावेळी डॉ. कणकवलीकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यांनतर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी डॉ. कणकवलीकर यांच्यासह विनायक ठाकरे, रामलिंग ग्रामपंचायतीचे सरपंच विठ्ठल घावटे, ग्रामपंचायत सदस्य सागर घावटे, श्रेयस नेटके, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष दत्तात्रय कापरे, बाबुराव चत्तर गुरुजी, निशिगंधा कणकवलीकर यांचा सत्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सदाशिव पवार, खजिनदार केशरताई पवार आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. या प्रसंगी प्राचार्य गणेश मिटपल्लीवार आणि प्राचार्य विनायक म्हसवडे यांनी मनोगत व्यक्त केली. दोन्ही विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषणे, समूहगीत, समूहनृत्य, योगा, स्काऊट गाईड, परेड इत्यादी विविध प्रकारचे कार्यक्रम सादर केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात सदाशिव पवार यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगताना प्रामाणिकपणे कष्ट करण्याची तसेच भरपूर अभ्यास करुन देशाचे नाव मोठे करण्याची प्रेरणा दिली. तसेच थोर क्रांतीकारक आणि सैनिकांमुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले. याचे आपण स्मरण ठेवले पाहिजे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. सर्वांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे व प्रभावी वक्तृत्वाचे कौतुक केले. या प्रसंगी शैक्षणिक मार्गदर्शिका शुभ्रा लाहिरी, शैक्षणिक सल्लागार के. बी. सोनवणे, व्यवस्थापक सुनिल शिंदे, उपप्राचार्य स्वाती चत्तर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री मेमाणे व निलेश काळे यांनी केले तर गिरीष हारके यांनी आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)