शिक्षक बॅंकेस साडेपाच कोटींचा नफा : रोहोकले

840 कोटींच्या ठेवीवर 7.75 टक्के, तर कर्जाचा व्याजदर 10.50 टक्के

नगर – तीन वर्षांपूर्वी कर्ज वाटपाच्या चिंतेत असलेल्या प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या ठेवी अवघ्या तीन वर्षात 325 कोटींनी वाढल्या असून मार्च अखेर 830 कोटी रुपयांर्पंत जाऊन पोहोचल्या आहेत. बॉकेला गेल्या आर्थिक वर्षात 5 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. हाच नफा फक्ततीन वर्षांपूर्वी 85 लाख रुपये इतका होता. अशी माहिती बॅकेचे अध्यक्ष रावसाहेब रोहोकले यांनी पत्रकार परीषदेत दिली.

रोहोकले यांनी, जाहिरनाम्यात सांगितल्या प्रमाणे सभासदांच्या ठेवीवरील व्याज वाढवून 7.75 टक्के तर कर्जावरील व्याज 0.25 टक्‍क्‍यांनी कमी करून तो 10.50 टक्के इतका करण्यात आला आहे. तसेच सभासदांची कर्ज मर्यादा वाढविण्यात आली असून ती 20 लाखांपर्यंत करण्यात आली असून या सर्व बाबींची अंमलबजावणी 1 मे पासून करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. बॅंकेने उत्पन्नाचे स्त्रोत शोधून ट्रेडींगच्या माध्यमातून 1 कोटी रुपयांचा नफा मिळविल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बॅंकेचे सर्व संचालक, विकास मंडळाचे अध्यक्ष संजय शिंदे, शिक्षक नेते संजय शेळके, आबा जगताप, रावसाहेब सुंबे आदी उपस्थित होते. यावेळी गुरूमाऊली मंडळाच्या जाहिरनाम्या नुसार बॅंकेचा कारभार 3 टक्‍क्‍याच्या फरकाने केला असल्याचे सांगून मंडळाने सभासदाभिमुख कारभार केल्याचे सांगितले. पारदर्शी आणि काटकसरीच्या कारभारामुळे बॅंक पुन्हा उर्जितावस्थेत आल्याचे रोहोकले यांनी सांगितले.

संचालक मंडळाने सर्वांच्या सहमतीने बॅंकेचा कारभार केला असून आज अखेरपर्यंत कर्ज वाटपही केले आहे. 50 वर्षे वयाच्या पुढील सभासदांची कर्जमंजुरी शाखा पातळीवर करण्यात आली आहे, तर सभासद कल्याण निधीतून आजारांसाठी 25 हजार रुपये, कन्यारत्न व कन्यादान योजनेतून सभासदांना 11 हजारापर्यंतच्या रकमेची मदत, कुटुंब आधार निधीतून वारसास 7 लाखांची मदत सभासद मयत झाल्यास वारसास 5 लाखांची मदत, कायम ठेवीचे व्याज 31 मार्चलाच दरवर्षी खात्यात जमा, बॅकेची वेबसाईट एटीएम सेवा आदी सुविधा देण्यात आल्या असून बॅंक ग्राहकांना सर्व सुविधा देण्यात येत असल्याचे रोहोकले यांनी सांगितले. बॅंकेचे सध्याचे वर्ष शताब्दी वर्ष असून यावर्षात बॅंकेकडे 115 कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या असल्याचे रोहोकल यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.