शिक्षक बॅंकेच्या अध्यक्षपदी राजेंद्र घोरपडे

उपाध्यक्षपदी महेंद्र अवघडे
सातारा,दि.29 प्रतिनिधी- प्राथमिक शिक्षक बॅकेच्या नूतन अध्यक्षपदी राजेंद्र घोरपडे यांची तर उपाध्यक्षमहेंद्र अवघडे यांची निवड करण्यात आली. मतदानाव्दारे निवडणूक प्रक्रियेव्दारे घोरपडे व अवघडे यांची निवड झाल्यानंतर समर्थक संचालक व शिक्षकांनी ढोल ताशांच्या गजरात गुलालांची उधळण करून आनंद व्यक्त केला.
बॅंकेचे माजी अध्यक्ष बळवंत पाटील व उपाध्यक्ष मोहन निकम यांनी राजीनामा दिल्यानंतर रविवारी प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या मुख्यसभागृहात अध्यक्ष,उपाध्याक्ष निवडीच्या प्रक्रियेचे आयोजन सहाय्यक निंबंधकांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले . 21 संचालक संख्या असलेल्या संचालक मंडळातून नूतन अध्यक्ष व उपाध्याक्ष निवडून द्यावयाचे होते. अध्यक्ष पदासाठी शिक्षक संघाचे संभाजीराव थोरात गटाचे राजेंद्र घोरपडे तर शिवाजीराव पाटील गटाचे महेंद्र अवघडे यांनी अर्ज दाखल केला. तर त्यांच्याविरोधात शिक्षक समितीच्यावतीने अध्यक्ष पदासाठी शिवाजी शिंदे तर उपाध्याक्ष पदासाठी सुभाष शेवाळे यांनी अर्ज दाखल केला. मतदानाव्दारे निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर निकालाअंती राजेंद्र घोरपडे यांनी 17 तर महेंद्र अवघडे यांना 12 अशी सर्वाधिक मते पडल्याने ते विजयी झाले तर समितीचे शिवाजी शिंदे व सुभाष शेवाळे यांना प्रत्येकी 4 मते पडली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निकाला जाहीर केल्यानंतर नूतन अध्यक्ष व उपाध्याक्ष यांनी सातारा शहरातील महापुरूषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण केला. तसेच शिक्षक बॅंकेची प्रतिष्ठा अधिक वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.

अवघडेंवर रूसवा कोणाचा
दरम्यान, नूतन निवडीत शिक्षक बॅंकेत बाहुबली नेत्यांमध्ये अंतर्गत राजकारण घडले. यापूर्वी सत्तेपासून दूर ठेवलेल्या शिवाजीराव पाटील गटाला निवडीमध्ये सामावून घेण्यात आले . त्या गटाला महेंद्र अवघडे यांच्या रूपाने उपाध्याक्ष पदाची संधी देण्यात आली. मात्र, अध्यक्ष पदासाठी उमेदवारी दाखल केलेल्या राजेंद्र घोरपडे यांना 17 तर उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेल्या महेंद्र अवघडे यांना 12 मते मिळाली. दोघांमध्ये 5 मतांचा फरक राहिल्याचे दिसून येताना उपाध्याक्षपदासाठी झालेल्या मतमोजणी प्रकियेत 5 मते अवैध ठरविण्यात आल्याचे समोर आले. त्यामुळे अवघडे यांच्यावर नेमका रूसवा कोणाचा अशी चर्चा निकालानंतर शिक्षक बॅंकेच्या आवारात रंगली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)