शिक्षक बदली प्रक्रियेत कही खुशी,कही गम

संग्रहित फोटो

संगमनेर – सरकारने शिक्षक बदल्यांसाठी ऑनलाईन पद्धतीचा अवलंब केला असल्यामुळे बदली प्रकरणात सर्वच राजकीय पुढा-यांचा व शिक्षकनेत्यांचा कुठलाही हस्तक्षेप राहिला नसल्यामुळे सर्वसामान्य शिक्षक समाधानी झाले आहेत. मात्र ज्या शिक्षकांना एकही शाळा न मिळाल्याने विस्थपित झालेले शिक्षक काही अंशी नाराज झाले असल्यामुळे याही शिक्षक बदलीमध्ये काही शिक्षक खुश तर काही नाराज झाल्याचे पाहावयास मिळाले.
संगमनेर तालुका पंचायत समितीच्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सभागृहात आज मंगळवारी शिक्षकाच्या ऑनलाईन बदल्याची प्रक्रिया पार पडली. या बदली प्रक्रियेत तालुक्‍यातील 343 जिल्हा परिषदेच्या शाळेमाधील 854 बदलीपात्र शिक्षकापैकी पहिल्या फेरीत 589 शिक्षकाच्या ऑनलाईन बदल्या करण्यात आल्या आहेत तर 124 शिक्षकांना विस्थापित व्हावे लागले आहेत. त्यात सर्वाधिक महिला शिक्षिकेचा समावेश आहे. सर्व शिक्षकाच्या बदली प्रक्रयेसाठी दुसरी फेरी घेण्यात येणार आहे. त्यात साधारण 60 ते 65 टक्केच बदल्या तालुक्‍यात होऊ शकतात उर्वरित शिक्षकांना संगमनेरच्या बाहेरील इतर तालुक्‍यातील शाळा शोधाव्या लागणार आहे. त्यामुळे त्याची चांगलीच डोकेदुखी वाढणार आहे.
शासनाने अत्यंत पारदर्शीपणाने शिक्षकाच्या बदल्या केल्या आहेत ऑनलाईन बदली प्रक्रयेमुळे शिक्षक बदली प्रक्रियेतील सुभेदारी बंद झाली आहे. बदली प्रक्रियेत राजकीय पक्षाच्या पुढा-यांचा तसेच शिक्षक नेत्याचा हस्तक्षेपच संपला आहे. इतरवेळी होणा-या आर्थिक उलाढाली या ऑनलाईन बदली प्रक्रियेमुळे पूर्णपणे थांबल्या असल्याची प्रतिक्रिया अनेक शिक्षकांनी खाजगीत बोलताना व्यक्त केल्या शिक्षकाच्या मनाप्रमाणे बदल्या झाल्या तसेच पतिपत्नी एकत्रीकरण झाल्याचा निश्‍चितच फायदा विध्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यास झाल्याशिवाय राहणार नाही असा आत्मविश्वास बदलीपात्र शिक्षकांनी व्यक्त केला

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)