शिक्रापूर पोलीस ठाण्याला कोण येणार नवीन सिंघम?

शिक्रापूर-शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पोलीस ठाण्यात जून 2016 रोजी रुजू झालेले पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांचा कार्यकाल संपण्याच्या दोन महिन्यांपूर्वी काल अचानक पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे येथे नियुक्ती बदली झाल्याने आता शिक्रापूर पोलीस स्टेशनला कोण नवीन सिंघम येणार? याबाबत चर्चा रंगू लागली आहे.
शिक्रापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रमेश गणपतराव गलांडे हे कोरेगाव भीमा दंगल, सणसवाडी दंगल या प्रकरणामुळे चांगलेच चर्चेत आले होते. कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेनंतर त्यांना निलंबित करण्याची मागणी देखील करण्यात येत होती. त्यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे ग्रामीण येथे एक आंदोलन देखील करण्यात आले. त्यापुर्वीच पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांची पुणे येथे बदली झाली. यापूर्वी नवीन अधिकारी येथे आल्यानंतर पहिले अधिकारी पोलीस ठाण्याचा चार्ज सोडत होते; परंतु येथे नवीन अधिकारी नियुक्त होण्यापूर्वी गलांडे यांची बदली झाली असून सध्या सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले हे पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून कामकाज पाहत आहेत. येथील अधिकारी बदली होऊन येथे नवीन अधिकारी नियुक्त झाले नसल्याची ही पहिलीच घटना आहे. आता या ठिकाणी कोण सिंघम अधिकारी येणार आणि ते काय कारवाई व गुन्हेगारी, वाहतूककोंडी रोखण्यासाठी काय विशेष काम करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याआधी काही महिन्यांपूर्वी चाकण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले संतोष गिरीगोसावी यांच्या नावाची चांगलीच चर्चा शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रंगली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)