शिक्रापुरात बंद; मूक मोर्चा

शिक्रापूर– महाराष्ट्रामध्ये सर्वत्र मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाने पेट घेतला असताना आता ग्रामीणभागातही या आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटत आहेत, त्यामुळे शिक्रापूर येथे देखील आज (शनिवारी) ग्रामस्थांनी बंद पुकारत, मूक मोर्चा काढून मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाला पाठींबा दर्शविला आहे.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथे आज मराठा क्रांती मोर्चाला पाठींबा दर्शवित बंद पुकारण्यात आला. यावेळी सर्व व्यापारी व व्यावसायिक व ग्रामस्थ दुकाने बंद ठेवत मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांनतर आंदोलकांच्या वतीने संपूर्ण गावातून मूक मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल, सरपंच जयश्री भुजबळ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मोर्चास सुरुवात करण्यात आली. तर गावातून काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये युवाक-युवतींसह सर्व ग्रामस्थ सहभागी झाले होते. तर मोर्चा शांततेत पार पडण्यासाठी शिक्रापूर पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. त्यांनतर शिक्रापूर गावातून मूक मोर्चा काढून पुणे-नगर रस्त्याने ग्रामपंचायत कार्यालयजवळ मोर्चाची सांगता करीत निषेध सभा घेण्यात आली. त्यांनतर मराठा आंदोलना दरम्यान शहीद काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी “अमर रहे अमर रहे काकासाहेब अमर रहे’ अशा घोषणा दिल्या. जर शासनाने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाहित तर शिक्रापुरात पुन्हा मोठे आंदोलन करणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिला. यावेळी आंदोलकांच्या वतीने महिला व शालेय युवतींच्या हस्ते शिक्रापू पोलीस ठाण्याचे निरिक्षक सदाशिव शेलार व मंडलाधिकारी उद्धव फुंदे यांना निवेदन देत आंदोलनाची सांगता करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)