शिक्रापूर-शिक्रापूर (ता. शिरूर) येथे अनेक दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून अनेक दुकाने, बॅंका, शोरूम, घरे या ठिकाणी तसेच अनेक दुचाकींच्या चोऱ्या होत असताना आता चोरट्यांनी शिक्रापूर येथील पाबळ चौकातील एक वाईन शॉपीचे शटर उचकटून दारूची चोरी केली आहे.
याबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्यात प्रशांत दत्तात्रय सासवडे (रा. शिक्रापूर, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे. तर सासवडे हे 19 एप्रिल रोजी वाईन शॉपी बंद करून घरी गेले त्यांनतर सकाळी येऊन पाहिले असता त्यांना वाईन शॉपीचे शटर उचकटलेले दिसले. त्यांनतर त्यांनी आतमध्ये जाऊन पहिले असता त्यांना आतमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या दारूंचे 78 बॉक्स चोरी गेल्याचे निदर्शनास आले असल्याने याबाबत प्रशांत दत्तात्रय सासवडे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार देविदास दगडे हे करत आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा