शिक्रापुरात एकाच रात्री दोन घरफोड्या

रक्षाबंधनसाठी गावी गेलेल्या दोघांच्या घरी चोरी

शिक्रापूर-येथील एका ठिकाणी एकाच रात्री दोन घरफोड्या झालेल्या असल्यामुळे ग्रामस्थ व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण वातावरण पसरले असून परिसरातील चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक व ग्रामस्थ करीत आहेत.

याबाबत शिवाजी बाळू भूरूक, सुरेश भागाजी सुपेकर (दोघे रा. जातेगाव रोड, शिक्रापूर) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. शिवाजी भूरूक हे पत्नी, मुलांसह रक्षाबंधन निमित्ताने कात्रज येथे नातेवाईकांकडे गेलेले होते. रात्री एक वाजण्याच्या सुमारास पुन्हा घरी आले असताना त्यांना घराच्या दरवाजाचा कोयंडा तुटलेला दिसला. त्यांना घरातील कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे एकवीस हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला असल्याचे निदर्शनास आले. याच ठिकाणहून काही अंतरावर राहणारे सुरेश सुपेकर हे पत्नी, मुलांसह रक्षाबंधन निमित्ताने आंबेगाव येथे नातेवाइकांकडे गेलेले होते.

दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घरी आले असताना त्यांना दरवाजाचे कुलूप तुटलेले असल्याचे आढळून आले. घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्थ पडलेले तसेच कपाटातील बावीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी गेले असल्याचे आढळून आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस उपनिरीक्षक जयप्रकाश चव्हाण व पोलीस नाईक अनिल जगताप, प्रताप कांबळे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×