शिक्रापुरात अवैध दारू विक्री हॉटेलवर पोलिसांचा छापा

शिक्रापूर- येथील मलठण फाटा परिसरामध्ये अवैध्य दारू विक्री करणाऱ्या हॉटेलवर शिक्रापूर पोलिसांनी छापा टाकून तेथील देशी दारूच्या बाटल्या जप्त करत दारू विक्री करणाऱ्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस नाईक योगेश नागरगोजे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
शिक्रापूर येथील मलठण फाटा येथे असलेल्या पेटपूजा हॉटेलमध्ये एक व्यक्‍ती दारूच्या बाटल्यांची विक्री करत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर यांना मिळाली. त्यांनतर सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर, पोलीस नाईक संदीप जगदाळे, योगेश नागरगोजे, हेमंत इनामे यांनी हॉटेल पेटपूजा या ठिकाणी जाऊन छापा टाकला असता त्या ठिकाणी अनिल गायकवाड हा व्यक्‍ती दारूच्या बाटल्या विक्री करत असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी त्यावर छापा टाकत दीड हजार रुपये किंमतीच्या दारूच्या 29 बाटल्या जप्त करून दारूविक्री करणाऱ्या अनिल अर्जुन गायकवाड (रा. शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे) यास ताब्यात घेत अटक केली आहे. याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार देविदास दगडे हे करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)