शिंदे महाविद्यालयात पदवीदान समारंभ उत्साहात

श्रीगोंदा – येथील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात पदवीदान समारंभ मोठ्या उत्साहाने साजरा झाला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य भाऊसाहेब काराळे उपस्थित होते.
या पदवीदान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बबनराव पाचपुते होते. यावेळी बोलताना कराळे म्हणाले, विद्यार्थ्यानी शिक्षण घेऊन स्वावलंबी बनावे व आपले ध्येय गाठावे. पाचपुते म्हणाले, विद्यार्थ्यानी जिद्ध, चिकाटी व प्रयत्नांच्या जोरावर कर्तुत्व गाजवावे. रयत शिक्षण संस्थेचा वसा व वारसा जोपासावा.
यावेळी विद्यार्थ्यांना व संशोधक प्राध्यापकाना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानादेव म्हस्के यांनी केले. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस, प्रकाशशेठ पटवा, स्थानिक व्यवस्थापन सामितीचे सदस्य, उपप्राचार्य सी .आर नगरे, प्रा .डॉ. एल. आर. पाटील, प्रा. एम. बी. खोमणे, श्रीमती वाय. बी. लबडे उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. देवेंद्र बहिरम यांनी तर आभार प्रा. एन. ए. शिंदे यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)