शिंदेवाडी, कासारआंबोलीत वृक्षारोपण

पिरंगुट- शिंदेवाडी (ता. मुळशी) येथील कानिफनाथ मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या सहकार्याने महादेव मंदिर परिसरातील डोंगरावर 400 रोपांची लागवड करण्यात आली. सामाजिक बांधिलकी जपत ट्रस्टने चालू वर्षी 500 महिलांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, ग्रामस्वच्छता अभियान आदी उपक्रम राबविले आहे. वृक्ष लागवड कार्यक्रमात राणी लक्ष्मीबाई सैनिकी शाळेच्या 350 विद्यार्थिंनी सहभागी झाल्या होत्या.
कमाडंट सारंग काशीकर, प्राचार्या पूजा जोग यांच्या मार्गदर्शनाखाली अनंत कुलकर्णी, संदीप पवार, शाम नागरे, भाऊराव मार्तंड, गजानन पाटील, प्रमोद झुरमुरे, प्रमिला महाले, विद्यार्थिनींनी वृक्षदिंडी काढत सर्व वृक्ष लागवडीची शपथ घेतली. यावेळी कासारआंबोलीच्या सरपंच सुवर्णा मारणे, भाविसेचे जिल्हा उपसंघटक राम गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य मोहन शिंदे, शेखर शिंदे, माजी सरपंच राजाभाऊ मारणे, नवनाथ शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने ट्रस्टचे अध्यक्ष शाम धुमाळ, ट्रस्टचे खजिनदार सचिन धुमाळ, विश्वस्त मोहन धुमाळ, भीमराव धुमाळ, राजु धुमाळ, विजय धुमाळ, अर्जुन धुमाळ, गणेश धुमाळ, अथर्व धुमाळ, शालन धुमाळ, सुलोचना धुमाळ, कल्पना धुमाळ, रोहिणी धुमाळ, विजया धुमाळ, सृष्टी धुमाळ यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)