शिंदवणेत चोरी; तीन लाखाचा ऐवज लंपास

लोणी काळभोर – शिंदवणे (ता. हवेली) येथे स्वयंपाकघराच्या उघड्या दरवाजातून प्रवेश करुन चोरट्यांनी 3 तोळे 3 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 2 लाख 56 हजार रुपये रोख रक्कम, असा एकूण 3 लाख 22 हजार किंमतीचा ऐवज चोरी करून नेल्याची घटना पहाटे 5:00 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

चोरी प्रकरणी ज्ञानोबा कुंडलिक महाडीक (वय 52, रा. वाकवस्ती, शिंदवणे, ता.हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाडीक हे मंगळवारी (दि.29) पाहुणे आल्याने घरीच होते. सर्वांनी जेवन केल्यानंतर रात्री 10:00च्या सुमारास सर्वजण झोपी गेले. नेहमीप्रमाणे त्यांचे वडील घराबाहेर असलेल्या ओसरीत झोपले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आज पहाटे 5:00च्या सुमारास ज्ञानोबा महाडीक यांना जाग आली, त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. परंतू, बाहेरून कडी लावल्याने तो उघडला नाही; त्यामुळे त्यांनी वडीलांना आवाज दिला, त्यांनी कडी काढल्यानंतर ज्ञानोबा महाडिक बाहेर आले. सर्व दरवाजाला लावलेल्या कड्या उघडल्या. त्यांना घराच्या बेडरूमचा दरवाजा उघडा दिसला, त्यांनी पत्नीस बोलावले. तपासणी केली असता कपाटातील दिड तोळे वजनाचे गंठण, अर्धा तोळ्याची कोरले, सोन्याचे दोन बदाम, ब्रेसलेट व अंगठी असे एकूण 66 हजार रुपये किमतीचे 3 तोळे 3 ग्रॅम सोन्याचे दागिने व 2 लाख 56 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 3 लाख 22 हजार रुपये किमती ऐवज चोरीस गेल्याचे लक्षात आले, महाडीक यांनी ऊरूळी कांचन दूरक्षेत्रात जाऊन तक्रार दिली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)