शाहूपुरी गजानन महाराज मंदिरात गुरुपौर्णिमा उत्साहात

सातारा ः अर्कशाळानगर येथील गजानन महाराज मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त असंख्य भाविकांनी महाआरतीला उपस्थिती लावली. (छाया ः संजय कारंडे )

सातारा, दि. 27 (प्रतिनिधी) – शाहूपुरी येथील अर्कशाळानगर येथील प. पू. सद्गुरु श्री गजानन महाराज मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासून भक्तांनी गजानन महाराज मंदिरात श्रींच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. शुक्रवार, दि. 27 जुलै रोजी सकाळी 7 ते 8.30 श्रींच्या मूर्तीवर पंचामृत महाअभिषेक, पूजाअर्चा, आरती व नामस्मरण करण्यात आले. सकाळी 9 ते 10 मंत्रपठण व नामस्मरण, सकाळी 11 वा. श्री गजानन विजय ग्रंथाचे 16 व्या अध्यायाचे सामुदायिक वाचन करण्यात आले. दुपारी 11.30 ते 12.00 महाआरती, नामस्मरण करण्यात आले. दुपारी 12.00 ते 1.00 वाजेपर्यंत भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी असंख्य भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)