शाहूपुरीचे काम स्वीकारण्यास नकार

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे सातारा पं.स.समोर धरणे

गुरूनाथ जाधव

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सातारा  – शाहुपूरी ग्रामपंचायतीचा कार्यभार सातारा तालुक्‍यातील कोणताही ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी स्वीकारणार नाही,अशी माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन तालुका अध्यक्ष युवराज सांळुखे यांनी दिली. सातारा पंचायत समिती कार्यालयासमोर तालुक्‍यातील सर्व ग्रामसेवकांनी आजपासून असहकार धरणे आंदोलन सुरू केले आहे. शाहुपूरी ग्रामपंचायतीत घडलेल्या घटनेचा जाहिर निषेध नोंदवताना ग्रामविकास अधिकारी एम. व्ही. कोळी यांच्याबाबत घडलेली घटना निंदनीय आहे. यामुळे ग्रामसेवकांना काम करण्यासाठी भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत. यासाठी शासनाने गांभीर्यांने लक्ष देवुन या घटनेतील दोषीवर शासकीय कामात अडथळा तसेच अदखलपात्र गुन्ह्याप्रमाणे कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे दिली.

दि.23 रोजी सकाळी 11.30 च्या सुमारास 15 ते 20 लोकांच्या जमावाने अनाधिकाराने ग्रामविकास आधिकारी एम. व्ही. कोळी यांच्या केबिनमध्ये प्रवेश करून बुधवार नाका ते मोळाचा ओढा रस्त्याचे तसेच आकाशवाणी झोपडपट्टी त्रिशंकू भागातील गटर व लाईटचे काम का केले नाही,याची विचारणा करण्याच्या बहाण्याने संबंधित जमावाने त्यांना गाजराचा हार घालून या घटनेची व्हिडीओ क्‍लिप तयार केली. तसेच ती व्हायरल केली व प्रसार माध्यमांना देवून कोळी यांना व त्यांच्या पदाला अपमानित करून बदनामी केली.

यासोबत शासकिय कामकाजात अडथळा निर्माण केला. यामुळे ग्रामविकास अधिकारी भयभीत होऊन तणावाखाली गेले असल्याचे देखील साळुंखे यांनी सांगितले. या घटनेचा जाहिर निषेध नोंदवत तालुक्‍यातील 130 महिला व पुरूष ग्रामसेवकांनी धरणे आंदोलनात सहभाग नोंदवला. या असहकार धरणे आंदोलनाला यावेळी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष काका पाटील, बांधकाम विभाग राज्य अध्यक्ष आर. वाय. शिंदे, पंचायत समिती सभापती, उपसभापती सदस्य, पंचायत समिती लिपिक वर्ग, विस्तार अधिकारी संघटना, तसेच शाहुपूरी पंचायत समिती सदस्य संजय पाटील, शिवसेनेचे नरेंद्र पाटील, सरपंच गणेश आरडे, उपसरपंच राजेंद्र गिरी, सदस्य सुधाकर यादव, शंकर किर्दत, रमेश धुमाळ, अमित कुलकर्णी, राहुल यादव, राजापूरे यांनी पाठिंबा दिला आहे.

ग्रामविकास अधिकाऱ्याची पोलिसात तक्रार

शाहूपुरी ग्रामपंचायतीमध्ये एम. व्ही. कोळी यांच्याबाबत अवमानकारक कृत्य केल्याबाबत शाहुपूरी ग्रामपंचायतीच्या कर्मचारी वर्गाने ग्रामपंचायतीला टाळे ठोकून काम बंद आंदोलन केले. कर्मचारी आंदोलनामुळे कामकाज ठप्प झाले होते. दरम्यान ग्रामविकास अधिकारी कोळी यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून तक्रार दाखल केली आहे.


गेल्या 15 वर्षात कधीही असा प्रकार घडला नाही. ग्रामविकास अधिकारी कोळी यांचा अपमान व शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा. यापुढे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर शाहूपुरीमधील सर्व ग्रामस्थ रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील.

– संजय पाटील,
पंचायत समीती सदस्य शाहूपुरी सातारा.

शाहुपूरी ग्रामपंचायती अंतर्गत ग्रामसेवकाच्या बाबतीत घडलेला प्रकार दुर्दैवी आहे. सुसंवादाने प्रश्‍न सुटने गरजेचे असताना लोकांनी असे पाऊल उचलू नये. शाहूपुरी ग्रामविकास आघाडी या सर्व प्रकाराचा निषेध करते. विरोधक असलो तरी आम्ही या अश्‍या प्रकारांच्या बाबतीत अधिकाऱ्यांच्या पाठीशी आहोत.
– भारत भोसले
ग्रामविकास आघाडी शाहुपूरी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)