शाहिद कपूरच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तरुणाचा मृत्यू 

मुंबई  – बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर याच्या आगामी ‘कबीर सिंह’ चित्रपटाची शूटिंग सध्या देहरादूनमध्ये सुरु आहे. परंतु यावेळी एका तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. राम कुमार (वय-३५) असे मृत तरुणाचे नाव असून तो सेटवर  जनरेटर ऑपरेटर म्हणून काम करत होता.

राम कुमार  सेटवर रिपेअरिंगचे काम करत असताना त्याचा मफलर जनरेटरच्या पंखात अडकला. यानंतर डोकेही पंख्याला आपटल्याने गंभीर दुखापत झाली. राम कुमारला देहरादूनच्या रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेबाबत त्याच्या कुटुंबियांना पोलिसांनी कळविले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, कबीर सिंह हा तेलुगुतील चित्रपट सुपरहिट चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’चा रिमेक आहे. यामध्ये शाहिद आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत. या घटनेवेळी दोघेही तेथे उपस्थित नव्हते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)