शाहिद कपूर “पद्मावत’नंतर एकदम फॉर्मात आला आहे. बऱ्याच दिवसांपासून रडतखडत चाललेली त्याची करिअरची गाडी एकदम रूळावर आली आहे. आता अर्जुन रेड्डीच्या रिमेक फिल्ममध्ये लीड रोलसाठी शाहिदची निवड झाली आहे. त्या फिल्मसाठी शाहिदला 7 कोटी रुपयांचे मानधन मिळणार आहे, असे समजते आहे. “पदमावत’च्या यशानंतर शाहिदने त्याची ब्रॅन्ड व्हॅल्यू वाढवली आहे, हेच यातून दिसते आहे.
“अर्जुन रेड्डी’ हा सिनेमा तेलगूमध्ये गेल्यावर्षातला सुपरहिट सिनेमा होता. रिमेकसाठी सुपरहिट सिनेमांच्या हक्कांची विक्री कोट्यवधी रुपयांना होत असते. त्यानुसार “अर्जुन रेड्डी’च्या निर्मात्यांनी हिंदी निर्मात्यांना रिमेकचे हक्क 7 कोटी रुपयांना विकून टाकले आहेत. याच्या रिमेकमधील लीड रोलसाठी शाहिद कपूरचे नाव पूर्वीच फायनल झाले होते. आता पुढील तयारी सुरू झाली आहे.
निर्माते स्वतःच हिंदी रिमेकची स्टोरी लिहीत आहेत. नवीन हिरोईनचा शोधही घेतला जातो आहे. तेलगूमध्ये या सिनेमाची कथा मेडिकल स्टुडंटच्या जीवनावर अधारलेली होती. हिंदीतही तसेच असणार आहे. या हिंदी रिमेकनंतर शाहिदला त्याच्या करिअरमध्ये कोनताच अडथळा जाणवणार नाही, इतकी त्याची ब्रॅन्ड व्हॅल्यू वाढलेली असेल.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा