शाहरुख खानची पोझ आसाममध्ये ट्रॅफिक कंट्रोलसाठी

गेल्या अडीच दशकांपासून शाहरुख खान आपल्या रोमॅंटिक रोलमुळे बॉलिवूडचा चहेता ऍक्‍टर बनला आहे. त्याच्या रोल व्यतिरिक्‍त दोन्ही हात पसरून तिरक्‍या स्टाईलमध्ये उभे राहण्याच्या त्याच्या स्टाईलमुळेही तो लोकप्रिय झाला आहे. त्याची ही सिग्नेचर पोझच आता आसाममध्ये ट्रॅफिक कंट्रोलसाठी उपयोगी येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आसाम सरकारने वाहतुकीचे नियमन करण्यासाठी शाहरुखच्या या पोझची मदत घेण्याचे ठरवले आहे. आसामचे असिस्टंट पोलिस आयुक्‍त पांजित डोवराह यांनी ट्‌विटरवर एक संदेश दिला आहे. शाहरुखच्या या पोझनी कित्येक वर्षे चाहत्यांच्या हृदयामध्ये स्थान पक्के केले आहे. त्याबरोबर वाहतुक नियंत्रणासाठी एक संदेशही दिला आहे. या संदेशामध्ये दोन्ही हात पसरून उभ्या असलेल्या एका व्यक्‍तीचे चित्रदेखील आहे.

या ट्‌विटबाबत जेंव्हा शाहरुख खानला समजले तेंव्हा त्याने या “बेस्ट मेसेजला या पोझमुळे लोकप्रिय केले.’ अशी प्रतिक्रया दिली. त्याचबरोबर ट्रॅफिकच्या नियमांचे व्यवस्थित पालन करण्याचे आवाहनही त्याने केले आहे. शाहरुख नेहमीच अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास तयार असतो. सध्या तो “झीरो’च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. “झीरो’च्या काही भागाचे शुटिंग नुकतेच अमेरिकेत झाले. उर्वरित शुटिंग लवकरच पूर्ण होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)