शाहरुखच्या “सॅल्युट’मध्ये करीना कपूरची एन्ट्री 

भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या जीवनावर आधारीत “सॅल्युट’चे प्रॉडक्‍शन गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. मात्र शाहरुख खान मुख्य रोल करणार या व्यतिरिक्‍त त्याबद्दलच्या घडामोडींची कोणतीच चर्चा मिडीयामध्ये होत नव्हती. आता मात्र “सॅल्युट’बाबत एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या सिनेमामध्ये कोणीही हिरोईन नसणार असे पूर्वी समजले होते. आता करीना कपूर ही यातील हिरोईन असणार आहे, असे समजले होते. पण अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नव्हती.
आता करीनाच्या ऐवजी भूमि पेडणेकर ही हिरोईन असणार आहे, असे समजते आहे. शाहरुख सध्या “झिरो’च्या कामामध्ये व्यस्त आहे. “झिरो’च्या कामातून मोकळा झाल्यावर तो “सॅल्युट’च्या कामाला सुरुवात करणार आहे. जरी भूमिबाबतची बातमी खरी असली तरी करीनाने हा सिनेमा सोडल्याचे मात्र अधिकृतपणे समजलेले नाही. त्यामुळे तिचाही रोल सिनेमात असण्याची शक्‍यता आहे. शाहरुख बरोबरच्या सिनेमामुळे भूमि पेडणेकरची तर अगदी लॉटरीच लागली आहे. आयुष्मान खुरानाबरोबर “दम लगाकर हैय्या’मधून पदार्पण केल्यानंतर अक्षय कुमारच्या “टॉयलेट’मध्ये तिला चांगला ब्रेक मिळाला होता. याशिवाय “लस्ट स्टोरी’मध्येही ती दिसली होती. करण जोहरच्या मल्टीस्टार “तख्त’मध्येही ती असणार आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)