शासकीय कार्यालयात कॅमेरे बसवावेत

क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेड शेतकरी संघटनेची तहसीलदारांकडे मागणी

कराड – कराड तालुक्‍यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक मशिन्स बसवावेत. तसेच नागरिकांच्या आलेल्या अर्जावर तात्काळ कारवाई केली जावी, अशी मागणी क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेड शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार राजेश चव्हाण यांना देण्यात आले आहे.

निवेदनातील म्हटले आहे की, स्वच्छ व पारदर्शक कारभारासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून बायोमेट्रिक मशिन्स बसवून ते चालू स्थितीत ठेवण्यात यावेत. अधिकारी व कर्मचारी यांच्या कार्यालयातील कामाची वेळ निश्‍चित ठरणे आवश्‍यक आहे. शासकीय कार्यालयात नागरिकांचे अर्ज घेण्यास खूप वेळ जातो. तसेच वेळेत पोहोच देखील मिळत नाही. इतर जिल्ह्यातील कार्यालयात नियमांचे काटेकोर पालन केले जाते. शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्याकरिता हालचाल रजिस्टर ठेवण्यात येवून त्यामध्ये वेळोवेळी नोंदी घेतल्या जातात. त्याबाबतचे संबंधितांना आदेश दिले जातात. मात्र कराड तालुक्‍यात अनेक शासकीय कार्यालयात त्या पद्धतीने कामकाज होताना दिसत नाही. त्यामुळे या निवेदनाचा गांभिर्याने विचार होवून कराड तालुक्‍यातील सर्व शासकीय कार्यालयांना आदेश देण्यात यावेत अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर विजय पाटील यांच्यासह इतर 26 पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)